SRHvsKKR : पुण्याच्या राहुलचं अर्धशतक; चेन्नईच्या मैदानात गाठला मैलाचा पल्ला

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

टी नटराजनच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. पण तोपर्यंत त्याने आपल्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली होती. 

युएईतील आयपीएल स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात दमदार फटकेबाजी करणाऱ्या KKR च्या राहुल त्रिपाठीने यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत दमदार अर्धशतक झळकावले. शुभमन गिलच्या रुपात कोलकाता नाईट रायडर्सला पहिला धक्का बसल्यानंतर राहुल त्रिपाठी क्रिजमध्ये उतरला. त्याने नितीश राणाच्या साथीने 93 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने त्याने 53 धावा केल्या. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातील हे अर्धशतक त्याचा आत्मविश्वास उंचावणारे असेच आहे.

 

टी नटराजनच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. पण तोपर्यंत त्याने आपल्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली होती.  महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणारा राहुल त्रिपाठी हा मूळचा पुण्याचा आहे. मागील हंगामात त्याने अखेरच्या टप्प्यात लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यामुळेच यावेळी सुरुवातीलाच त्याला बढती मिळाली. 2017 मध्ये राहुलने पुणे सुपरजाएट्सच्या संघातून आयपीएलमध्ये डेब्यू केला. या हंगामात त्याने 14 सामन्यात 391 धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने केलेली 93 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. 

IPL 2021 : कोरोनातून सावरलेल्या KKR च्या राणादाची स्फोटक खेळी

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत 11 सामन्यात राहुलने 230 धावा केल्या होत्या. यात 81 ही त्याची सर्वोच्च खेळी होती. अर्धशतकी खेळीसर राहुल त्रिपाठीने आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पाही पार केला. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने 46 सामन्यात 1041 धावा केल्या आहेत. यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तो कोणत्याही क्रमांकावर येऊन संघासाठी उपयुक्त खेळी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. 


​ ​

संबंधित बातम्या