उर्वरित आयपीएल न खेळल्यास मानधन कपात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 June 2021

अमिरातीत होणाऱ्या आयपीएलमधून बहुतेक सर्व परदेशी खेळाडू माघार घेण्याच्या स्थितीत आहेत, त्याच वेळी बीसीसीआयनेही ठाम पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. जेवढे सामने खेळलात तेवढेच मानधन मिळेल, म्हणजेच उर्वरित सामने खेळला नाहीत तर काहीही मिळणार नाही, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - अमिरातीत होणाऱ्या आयपीएलमधून बहुतेक सर्व परदेशी खेळाडू माघार घेण्याच्या स्थितीत आहेत, त्याच वेळी बीसीसीआयनेही ठाम पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. जेवढे सामने खेळलात तेवढेच मानधन मिळेल, म्हणजेच उर्वरित सामने खेळला नाहीत तर काहीही मिळणार नाही, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

फ्रँचाईसने प्रत्येक खेळाडूशी केलेल्या करारानुसार ते जेवढे सामने खेळले आहेत, त्याच प्रमाणात पैसे मिळतील. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंसचा कोलकाताबरोबर १५.५ कोटींचा करार आहे. यंदाच्या टप्प्यात तो सात सामने खेळला. त्यानुसार त्याला ७.७५ कोटी मिळतील; परंतु तो अमिरातीतील स्पर्धेत खेळला नाही तर त्याला पुढील काही मानधन मिळणार नाही. 

जेवढे सामने खेळले तेवढेच मानधन दिले जाणार, या वृत्ताला बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. अमिरातीतील उर्वरित आयपीएलमध्ये आमचे खेळाडू खेळणार नाहीत, असे इंग्लंड मंडळाने अगोदरच जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघही याच कालावधीत बांगलादेश दौऱ्यावर आहे.


​ ​

संबंधित बातम्या