IPL Fastest Fifties Record : एबी कितव्या नंबरला पोहचला माहितेय?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

सलग दुसरे अर्धशतक झळकवणारा ग्लेन मॅक्सवेल चौथ्या स्थानावर आहे. केकेआर विरुद्धच्या अर्धशतकासाठी त्याने एबीपेक्षा एक चेंडू जास्ती घेतला.

RCB vs KKR , 10th Match : चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या रायल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात धावांची बरसात झाली. फॉरनच्या गड्यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने निर्धारित 4 बाद 204 धावा केल्या . एबी डिव्हिलियर्सने 34 चेंडूत 76 धावांची खेळी केली. 27 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. या खेळीमुळे यंदाच्या हंगामात सर्वात जलद अर्धशतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. यापूर्वी पंजाब किंग्जच्या दिपक हुड्डाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध  20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. यंदाच्या हंगामात सर्वात जलद अर्धशक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पृथ्वी शॉ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

सलग दुसरे अर्धशतक झळकवणारा ग्लेन मॅक्सवेल चौथ्या स्थानावर आहे. केकेआर विरुद्धच्या अर्धशतकासाठी त्याने एबीपेक्षा एक चेंडू जास्ती घेतला. 28 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. कोलकाता नाईट रायडर्सचा राहुल त्रिपाठी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने देखील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलच्या नावे आहे. 2018 च्या हंगामात लोकेश राहुलने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 

IPL 2021, RCB vs KKR : पुण्याच्या राहुलचा जबऱ्या कॅच; मिस्ट्री स्पिनरच्या नावे 'विराट' विकेट (VIDEO)

त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या युसूफ पठाणच्या नावे असलेल्या विक्रम मोडीत काढला होता. 2014 च्या हंगामात ईडन गार्डन्सच्या मैदानात युसूफ पठाणने 7 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 72 धावांची धमाकेदार इनिंग खेळली होती. यावेळी युसूफने 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. 2017 च्या हंगामात सुनील नरेन याने युसूफ पठाणच्या विक्रमाशी बरोबरी करत 15 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. पण 2018 मध्ये केएल राहुलने हा विक्रम आपल्या नावे केला. ऑल टाईम फास्टर फिफ्टी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आजही अव्वलस्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या सुरेश रैनाने 2014 च्या हंगामात 16 चेंडूत फिफ्टी झळकावली होती.    

IPL 2021, MIvsSRH Match Highlights : MI म्हणजे 'डेथ ओव्हर्सचा डेंजर झोन' (VIDEO)

ऑल टाईम फास्टर फिफ्टीच्या यादीत प्रत्येकी आठ- आठ फलंदाजांनी 17  आणि 19 चेंडूत शतक झळकावले आहे.  चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. जोस बटलर आणि पंत या दोघांनी 18 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केलाय. 20 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घालणाऱ्या फलंदाजांमध्ये 10 जणांचा समावेश आहे. एबी डिव्हिलियर्सने 2012 च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात  21 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 


​ ​

संबंधित बातम्या