IPL 2021 : कॅप्टन कूल धोनीचं द्विशतक; अनोख्या विक्रमाला गवसणी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

दोन्ही लीगमध्ये मिळून पंजाबविरुद्धचा धोनीचा 200 वा सामना ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले असून 2 वेळा चॅम्पियन लीग स्पर्धा जिंकली आहे.  

IPL 2021, PBKS vs CSK:   इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या हंगामातील पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडू पराभव स्वीकारलेल्या चेन्नईने दुसऱ्या सामन्यात बॉलिंगमध्ये दमदारी कामगिरी करत जोरदार कमबॅक केले. पंजाब विरुद्धच्या सामन्यात टॉससाठी वानखेडेच्या मैदानात उतरल्यावरच धोनीच्या नावे विक्रमाची नोंद झाली. चेन्नई सुपर किंग्जकडून 200 सामने खेळण्याचा पराक्रम धोनीने आपल्या नावे केलाय. 

आयपीएलमध्ये धोनीने चेन्नईकडून 176 मॅचेस खेळल्या आहेत. याशिवाय चॅम्पियन लीग टी-20 मध्ये धोनीने 24 मॅचेस या चेन्नईकडून खेळल्या आहेत. दोन्ही लीगमध्ये मिळून पंजाबविरुद्धचा धोनीचा 200 वा सामना ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले असून 2 वेळा चॅम्पियन लीग स्पर्धा जिंकली आहे.  

BCCIच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नटराजन का नाही; जाणून घ्या कारण​

युएईमध्ये रंगेलल्या आयपीएल स्पर्धेपूर्वी महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यावेळीच त्याने चेन्नईकडून खेळणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र परदेशात रंगलेल्या हंगामात धोनीच्या संघावर चांगलीच नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जवर प्ले ऑफमधून बाहेर पडण्याची वेळ आली होती. यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या लढतीत दिल्ली विरुद्ध चेन्नईच्या संघाने पुन्हा निराशा केली. पण या पराभवातून सावरत पंजाब विरुद्धच्या संघात संघाने दमदार कमबॅक केले.


​ ​

संबंधित बातम्या