IPL 2021 : कोण आहे शाहरुख खान? जाणून घ्या प्रितीच्या संघाची लाज राखणाऱ्या 'बाजीगर'बद्दल

सकाळ स्पोर्ट्स टीम
Saturday, 17 April 2021

आयपीएलमधील पहिले वहिले अर्धशतक 3 धावांनी हुकले असले तरी तो 'हार कर जीतने वाला बाजीगर' ठरला. 

Shahrukh Khan Against CSK : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जची हवा निघाली. आघाडीच्या फलंदाजांनी दिपक चाहरसमोर गुडघे टेकले. संघ संकटात असताना प्रितीच्या संघातील (Punjab Kings Owner Preity Zinta) शाहरुख खानने (Cricketer Shahrukh Khan) संघाची लाज राखली.  यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने 47 धावांची खेळी केल्यामुळे पंजाबच्या संघाला  शंभरी पार करण्यात यश आले. बॉलिवूड स्टार शाहरुखच्या नावाचा हा क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो. आयपीएलच्या हंगामात पहिल्या फेरीत त्याला बोलीच लागली नव्हती. दुसऱ्या राउंडमध्ये प्रितीच्या पंजाब संघाने त्याच्यासाठी 5.25 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतली. पंजाबचे किंग्ज ढेपाळल्यानंतर शाहरुखने संघाचा डाव सावरला. त्याची खेळी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला असेल. पण हा चेहरा देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. 

25 वर्षीय खेळाडूने ज्या संघाच्या विरुद्ध धमाकेदार खेळी करुन आपल्यातील क्षमता दाखवू दिली त्या चेन्नईतच  शाहरुखचा जन्म झालाय. आघाडीच्या फलंदाजांचा संघर्ष गळून पडल्यावर चेन्नई सुपर किंग्जच्या भेदक माऱ्यासमोर शाहरुख मोठ्या धीराने उभा राहिला. त्याचे शॉट्स हे डग आउटमध्ये बसलेल्या आघाडीच्या फलंदाजांची चूक दाखवून देणारे असेच होते. एक मॅच आणि त्यातील 8 रन्सचा अनुभव पाठिशी असलेल्या शाहरुखने दिमाखदार खेळ केला. त्याने 36 चेंडूत 47 धावांची खेळी केली. आयपीएलमधील पहिले वहिले अर्धशतक 3 धावांनी हुकले असले तरी तो 'हार कर जीतने वाला बाजीगर' ठरला. आपल्या डावात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार खेचले.  

IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'

कोण आहे मसूद शाहरुख खान

मसूद शाहरूख खान चेन्नई (तमिळनाडू) (ChennaiCity in Tamil Nadu) तील खेळाडू आहे. 27 मे 1995 मध्ये चेन्नईतच त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेट आणि सिनेमा याचे वेड आहे. त्याचे वडील चमड्याचा व्यापार करतात. शाहरुखचे क्रिकेट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात त्याची आई लुबना यांनी त्याला चांगली साथ दिली. 

प्रिती झिंटा झाली होती खूश

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूकडून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला आयपीएलच्या लिलावातील पहिल्या राउंडमध्ये कोणीही बोली लावली नव्हती. नाव आल्यानंतर भाव न मिळाल्याने तो निराशही झाला होता. पण दुसऱ्या राउंडमध्ये पंजाबच्या टेबलवरुन त्याच्यासाठी 5.25 कोटी मोजण्याची तयारी दाखवली. ज्यावेळी शाहरुखला खरेदी केले त्यावेळी संघाच्या मालकीन आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा याची हावभाव खूप बोलकी होती. शाहरुख आपल्या संघातून खेळणार...असे शब्दही प्रितीने उच्चारले होते. आयपीएलमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळतो. त्याच अनुषंगाने शाहरुखला आपल्या ताफ्यात घेतल्यानंतर प्रिती खूश झाल्याचे पाहायला मिळाले होते.  

टेनिस बॉलवर खेळायचा क्रिकेट 

शाहरुख खानने एका मुलाखतीमध्ये टेनिस बॉलवर क्रिकेटला सुरुवात केल्याचे सांगितले होते. रविचंद्रन अश्विन, कार्तिक आणि श्रीकांत ही मंडळी ज्या डॉन बॉस्को आणि सेंट बेडे या शाळेत शिकली त्याच ठिकाणी शाहरुखचेही शिक्षण झाल आहे. शाळेत तो टेनिस बॉलवर क्रिकेट खेळायचा.  ज्यावेळी आयपीएलमध्ये त्याला चांगली किंमत मिळाली त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद हा त्याचा तमिळनाडूचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक याला झाला होता. 


​ ​

संबंधित बातम्या