VIDEO : कमिन्सला युवा समदनं लगावलेला षटकार पाहून तुम्हीही व्हाल चकीत

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता संघानं हैदराबादवर दहा धावांनी विजय संपादन केला.

IPL 2021: आयपीएलच्या १४ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता संघानं हैदराबादवर दहा धावांनी विजय संपादन केला. या विजयासह कोलकातानं यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली आहे. हैदराबादला यंदा पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, युवा फलंदाज अब्दुल समद यानं सर्वांची मनं जिंकली आहेत.  

१८८ धावांचा पाठलाग करणारा हैदराबाद संघ १७७ धावापर्यंतच पोहचू शकला. १९ व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या अब्दुल समदनं सर्वांचीचं मनं जिंकली. अनुभवी पॅट कमिन्सला आपल्या पहिल्याच चेंडूवर अब्दुल समदनं खणखणीत षटकार लगावला. समदनं तबब्ल ९३ मीटरचा षटकार लगावला. या षटकात समदनं कमिन्सला दोन खणखणीत षटकार लगावले. जगातील अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजाची समदनं मनोसोक्त पिटाई केली. 

पाहा व्हिडिओ -


Brought to you by

२०२० मध्ये कोलकातानं कमिन्सला १५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीत आपल्या संघात घेतलं आहे.  आयसीसीच्या क्रमवारीत कमिन्स अव्वल स्थानावर विराजमान आहे. अशा गोलंदाजाला अब्दुल समदनं दोन षटकार लगावले.  
 पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी


​ ​

संबंधित बातम्या