IPL 2021 : वीकेण्ड लॉकडाऊनचा मुंबईतील सामन्यावर परिणाम होणार नाही

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनंतर आम्ही महापालिकेच्या आयुक्तांशी संपर्क साधला.

राज्यातील वीकेंण्ड लॉकडाउनचा मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यावर कोणाताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलीये. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनंतर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाउल उचलल्यानंतर मुंबईत होणाऱ्या आयपीएलमधील सामन्यावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.  

राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनंतर आम्ही महापालिकेच्या आयुक्तांशी संपर्क साधला. मुंबईतील सामन्यावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे, अशी माहिती एमसीएच्या अधिकाऱ्याने क्रिकबझला दिली. आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने हे जैव सुरक्षित वातावरणात होत असून यात कोणताही खंड पडणार नाही, असे एमसीएने पुन्हा एकदा स्पष्ट केले.  

IPL 2021: अली म्हणाला; नो अल्कोहोल लोगो; CSK लगेच झाले 'राजी'

राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कॅबिनेटची तातडीची बैठक पार पडली. यावेळी वीकेण्डमध्ये राज्यात पूर्णत: लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत वीकेंण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इतर दिवशी रात्री 8 ते सकाळी सकाळी 7 जमावबंदी असेल. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियवर यंदाच्या हंगामातील 10 सामने नियोजित आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील पहिला सामना 10 एप्रिल रोजी होणार आहे.  या दोन संघाशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सामने मुंबईच्या मैदानात रंगणार आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या