IPL 2021 : सोशल मीडियावर रंगली संजना वहिनींच्या ड्रेसची चर्चा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 10 April 2021

बुमराहने (MIvsRCB) यांच्यातील सामन्याने खेळायला सुरुवात केली.  याच वेळी  स्टूडिओमध्ये संजना गणेशन (Sanjana Ganeshan)  अँकरिंग करताना पाहायला मिळाले. 

IPL 2021 :  भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह काही दिवसांपूर्वीच स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत विवाह बंधनात अडकला. लग्नासाठी इंग्लंड दौऱ्यावरुन सुट्टी घेतलेल्या बुमराहाने आयपीएलमधून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. मुंबई इंडियन्सकडून तो मैदानात उतरला. दुसरीकडे  त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) ही देखील अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसली. शुक्रवारी बुमराहने (MIvsRCB) यांच्यातील सामन्याने खेळायला सुरुवात केली.  याच वेळी  स्टूडिओमध्ये संजना गणेशन (Sanjana Ganeshan)  अँकरिंग करताना पाहायला मिळाले. 

मोठ्या ब्रेकनंतर संजना स्क्रिनवर दिसल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील पहिल्या सामन्यावेळी संजना ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्या ड्रेसवरुन सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जर्सीच्या कलरशी मिळता जुळत्या रंगाच्या ड्रेस घालून संजना-बुमराह यांच्या मॅचिंगसंदर्भातही बोलले जात आहे.  

शास्त्री गुरुजी म्हणाले; धोनी vs पंत सामना पाहण्यापेक्षा ऐकायला मजा येईल

तिच्या ड्रेसच्या कलरवरुन ती मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत असल्याच्या काही प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे केकेआर फ्रेंचायझीच्या प्रमोशनसंदर्भातील तिचा फोटो काहींनी शेअर केला. अनेकजण तिच्या फोटोवर कमेंट करताना वहिनी अर्थात भावाची बायको असा उल्लेख करताना दिसले.  


​ ​

संबंधित बातम्या