धोनीच्या सल्ल्यामुळे गोलंदाजी सुधारली; नटराजनने सांगितलं यशाच गुपीत

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 - धोनीच्या सल्ल्यामुळे माझ्या गोलंदाजीत खूप सुधारणा झाल्याचं वक्तव्य यॉर्कर किंग नटराजन यानं केलं आहे.

IPL 2021 : नवी दिल्ली - युएईमध्ये झालेल्या आयपीएल हंगामात माजी कर्णधार एम.एस धोनी यानं दिलेल्या सल्ल्यामुळे माझ्या गोलंदाजीत खूप सुधारणा झाल्याचं वक्तव्य यॉर्कर किंग नटराजन यानं केलं आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात चेन्नई विरोधातील सामन्यादरम्यान धोनीनं स्लो बाऊन्सर आणि कटर टाकण्याचा सल्ला दिला होता. धोनीच्या या सल्ल्यामुळे माझ्या गोलंदाजीत धार आली, असं नटराजन यानं सांगितलं.

गतवर्षी नटराजन यानं तब्बल ७१ यॉर्कर टाकले होते. नटराजन  स्पर्धेत सर्वाधिक यॉर्कर फेकणारा गोलंदाज ठरला होता. युएईत झालेल्या या स्पर्धेत नटराजन यानं धोनी आणि एबी सारख्या गोलंदाजाला त्रिफाळाचीत केलं होतं. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘धोनीसारख्या महान खेळाडूसोबत बातचीत होणं हीच मोठी गोष्ट आहे. धोनीनं मला फिटनेसबाबत विचारलं अन् मला प्रोत्साहित केलं. जसा अनुभव वाढेल तसं कामगिरीत सुधारणा होईल. तसेच स्लो बाऊन्सर, कटर यासारख्या विविध चेंडूंचाही वापर करत जा.' 

सनराइजर्स हैदराबादच्या या वेगवान गोलंदाजानं युएईत झालेल्या स्पर्धेत धोनीला बाद केलं होतं. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळालं होतं. ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत नटराजन यानं छाप सोडली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

हेही वाचा : विराटची चिंता वाढली, आता अष्टपैलू खेळाडूला झाली कोरोनाची लागण

9 एप्रिलपासून स्पर्धेचा शुभारंभ
14 व्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात रंगत होणार आहे. ११ एप्रिल रोजी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात यंदाच्या हंगामातील त्यांचा पहिला सामना होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या