CSK चा पराभव का झाला? सुरेश रैनानं दिलं स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

चेन्नईचा सात गड्यांनी सहज पराभव

IPL 2021 : धोनीच्या चेन्नई संघाची आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात पराभवानं झाली. दिल्लीच्या संघानं चेन्नईचा सहज पराभव आपली दणक्यात सुरुवात केली. धोनीनं पहिल्या सामन्यातील पराभवाचं खापर गोलंदाजावर फोडलं होतं. या सामन्यात चेन्नईकडून अर्धशतकी खेली करणाऱ्या रैनानं सीएसकेच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाच्या मते सीएसकेला आणखी २० धावांची कमतरता जाणवली. आणखी २० धावा असत्या तर निकाल वेगळाच लागला असता, असं रैना म्हणाला. 

मुंबईच्या वानखेडे मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं चेन्नईचा सात गड्यांनी सहज पराभव केला. या सामन्यात चेन्नईकडून रैनानं सर्वाधिक धावांची खेळी केली होती. पण मोक्याच्या क्षणी रैना धावबाद झाला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. दिल्लीनं हे लक्ष८ चेंडू आणि सात गडी राखून आरामात पार केलं. सुरेश रैना म्हणाला की, पराभव नक्कीच निराशाजनक होता. हा सामना आणखी चांगला होऊ शकला असता. आमच्याकडून काही चुका झाल्या. पुढील सामन्यात त्या सुधारण्याचा निक्कीच आम्ही प्रयत्न करु.  

हेही वाचा ; द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

आणखी १५-२० धावा असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.  सामन्यात एकवेळ आम्ही पुनरागमन केलं होतं. पण नियमीत विकेट न मिळाल्यामुळे आमच्या हातून सामना गेला. पण यानंतर होणाऱ्या सामन्यात या चुका टाळण्याचा प्रयत्न करुस असं सुरेश रैना म्हणाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअवर १६ एप्रिल रोची पंजाबविरोधात चेन्नईचा पुढील सामना होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या