MIvsSRH : Oh oh ट्रेंट बोल्ट धावता_धावता 'कलमडला'; पाहा काय झाले (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 17 April 2021

हैदबादच्या डावातील कृणाल पांड्या घेऊन आलेल्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर वॉर्नरने खेणखणीत चौकार मारला.

IPL 2021 SRH vs MI : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ 150 धावांत आटोपला. क्विंटन डी कॉकच्या 40 धावा आणि कर्णधार रोहित शर्माने केलेल्या 32 धावांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या पाच षटकांच्या आतच डेविड वॉर्नर आणि बेयरस्टो यांनी 50 धावा पूर्ण केल्या. वॉर्नरच्या चौकाराने संघाच्या धावफलकावर 50 धावा लागल्या. 

हैदबादच्या डावातील कृणाल पांड्या घेऊन आलेल्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर वॉर्नरने खेणखणीत चौकार मारला. आउट साइट ऑफ लो फुलटॉस बॉलवर मारलेला शॉट अडवण्यासाठी मिडऑफला उभ्या असलेल्या ट्रेंट बोल्टने चेंडू मागे धाव घेतली. पण पळत असताना बॅलन्स गमावल्याने ट्रेंड बोल्ड जोरात मैदानात आदळल्याचे पाहायला मिळाले. ट्रेंड बोल्टला धावता धावता काय झाले? असा प्रश्न क्रिकेट चाहत्याच्या मनात निर्माण व्हावा, असाच तो सीन होता. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने पहिली ओव्हर टाकली. आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने केवळ दोन धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र बेयरस्टोने त्याचा चांगलाच समाचार घेतला. तीन फोर आणि एक सिक्सरसह त्याने 18 धावा खर्च केल्या. 

IPL 2021, SRH vs MI : IPL 2021 : सुर्या-रोहितसमोर विजय शंकर जिंकला! (VIDEO)

 

सनरायझर्स हैदराबादच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. यात बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. मनिष पांड्ये बेयरस्टो माघारी परतल्यानंतर मनिष पांड्ये स्वस्तात बाद झाला. डेविड वॉर्नरही रन आउट झाल्यामुळे सामन्यात पुन्हा ट्विस्ट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या स्पेलमध्ये ट्रेंट बोल्डने सामन्याला कलाटणी देणारी ओव्हर टाकली. त्याने राशीदला आल्या पावली माघारी धाडले. 


​ ​

संबंधित बातम्या