IPL 2021, SRH vs MI : IPL 2021 : सुर्या-रोहितसमोर विजय शंकर जिंकला! (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 17 April 2021

रोहित बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवने त्याची जागा घेतली. एक चौकार आणि एक षटकार खेचून त्याने आपल्या शैलीत फलंदाजी करण्याचे संकेत दिले.

IPL 2021 SRH vs MI : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दमदार कमबॅक केले. तगडी बॅटिंग लाईनअप असलेल्या मुंबईला त्यांनी अवघ्या 150 धावांत रोखले. टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉकच्या (Quinton De Kock) साथीने त्याने डावाला सुरुवात केली. कॅप्टन रोहित शर्माने  सलामीवीर डिकॉकच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करुन आपला निर्णय सार्थ ठरवला. मुंबई इंडियन्सचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना विजय शंकरने (Vijay Shankar) सनरायझर्स हैदराबादला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने आक्रमक खेळी करणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) 32 धावांवर बाद केले. आपल्या या छोट्याश्या खेळीत रोहितने 2 चौकार आणि 2 षटकार खेचले. 

तो बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवने त्याची जागा घेतली. एक चौकार आणि एक षटकार खेचून त्याने आपल्या शैलीत फलंदाजी करण्याचे संकेत दिले. पण विजय शंकरने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल टिपत सुर्याला 10 धावांवर तंबूत धाडले. विजय शंकरने घेतलेल्या या दोन विकेट्स पराभवाच्या हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादला मोठा दिलासा देणाऱ्या होत्या. विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये त्याच्याकडून बहूमुल्य कामगिरीची अपेक्षा आहे. नियमित सदस्य असलेल्या विजय शंकरने पहिल्या दोन सामन्यातील निराशा भरुन काढली आहे. ही गोष्ट हैदराबाद संघाला फायदेशीर अशीच आहे. 

IPL 2021 : जड्डूची कमाल; गेलचा झेल आणि राहुलचा गेम (VIDEO) 

IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'
 

आयपीएलच्या कारकिर्दीत गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात तो डगमगताना दिसले आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास आतापर्यंत त्याने 43 सामन्यात 187 बॉल टाकून 282 धावा खर्च करत 8 विकेट घेतल्या आहेत. यात 3 षटकात 19 धावा खर्चून 2 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. मागील हंगामात त्याने 7 सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या.


​ ​

संबंधित बातम्या