शुबमन गिलनं केली तुफान फटकेबाजी, KKRला दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

संघाचा सलामी विस्फोटक फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) फॉर्मात परतला आहे.

IPL 2021: नवी दिल्ली - IPL च्या १४ व्या हंगाम अवघ्या दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे. त्यापूर्वीच कोलकाता नाइट राइडर्स (KKR) संघासाठी दिलासादायक गोष्ट घडली आहे. संघाचा सलामी विस्फोटक फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) फॉर्मात परतला आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत गिल आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. पण आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी तो पुन्हा फॉर्मात परतला आहे. त्यामुळे केकेआर संघाच्या चाहल्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

IPL २०२१ आधी कोलकाता संघाच्या सराव सामन्यात शुबमन गिलने (Shubman Gill) ने तुफानी फटकेबाजी करत विरोधी संघाला साधव राहण्याचे संकेत दिले आहेत. सराव सामन्यात गिल यानं ३५ चेंडूत तुफानी ७६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं ११ चौकार आणि तीन खणखणीत षटकारही लगावले. गिलनं २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा जमवल्या. 

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

 सरावासाठी कोलकाता संघाला दोन टीममध्ये विभागलं होतं. पर्पल आणि गोल्ड या दोन्ही संघामध्ये मंगळवारी सामना पार पडला. पर्पल टीमने प्रथम फलंदाजी करताना फक्त ८७ धावा केल्या. प्रत्त्युत्तर दाखल गोल्ड संघाना एकही विकेट न गमावता हे आव्हान पार केलं.  

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

9 एप्रिलपासून स्पर्धेचा शुभारंभ
14 व्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात रंगत होणार आहे. ११ एप्रिल रोजी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात यंदाच्या हंगामातील त्यांचा पहिला सामना होत आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या