IPL 2021 : एकही सामना न खेळता श्रेयस अय्यरला मिळणार फुल सॅलरी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,  8 एप्रिल रोजी त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून आउट झाला आहे. जरी तो स्पर्धेतील एकही सामना खेळणार नसला तरी त्याला पूर्ण पगार मिळणार आहे. त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स हंगामासाठी 7 कोटी मोजणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत फिल्डिंग वेळी श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यामुळे त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेसह  आणखी काही महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागणार आहे.  बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,  8 एप्रिल रोजी त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

खेळणार नसूनही त्याला पगार कसा मिळणार?

श्रेयस अय्यरला भारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळ (BCCI) च्या विमा पॉलिसीमुळे पूर्ण सॅलरी मिळेल. 2011 मध्ये बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक खास पॉलिसी लागू केली होती. त्यानुसार दुखापतीमुळे किंवा दुर्घटनेमुळे खेळाडू आयपीएल स्पर्धेला मुकला तर त्याला करारानुसार मिळणारी रक्कम पूर्णपणे मिळण्याची तरतूद आहे. भारतीय संघाकडून खेळताना श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला विमा पॉलिसीमुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. 

IPL 2021: अली म्हणाला; नो अल्कोहोल लोगो; CSK लगेच झाले 'राजी'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात पार पडली होती. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू राहिला आहे. त्याने 79 सामन्यात 2200 धावा केल्या आहेत. 26 वर्षीय अय्यर मागील हंगामात  सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. पण मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत पंतकडे संघाची धूरा देण्यात आली असून युवांना प्राधान्य देणारा दिल्लीचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या