IPL 2021 : संजूची विक्रमी सेंच्युरी!

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाही जमलेली नाही. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने संघाची धूरा त्याच्या खांद्यावर दिली होती. 

पंजाबच्या संघाने दिलेल्या 200 + धावांचे टार्गेट चेस करताना संजू सॅमसनने कर्णधाराला साजेसा खेळ केला. त्याने 54 चेंडूत यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकवण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या कारकिर्दीतील त्याचे हे तिसरे शतक ठरले. यापू्र्वी 2017 च्या हंगामात त्याने 102 धावा केल्या होत्या. तर 2019 मध्ये त्याने नाबाद 102 धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये कॅप्टन्सीच्या पदार्पणात शतकी खेळी करण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावे झाला आहे. संघाचे नेतृत्वा खांद्यावर पडल्यानंतर पहिल्या सामन्यात  आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाही जमलेली नाही. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने संघाची धूरा त्याच्या खांद्यावर दिली होती. 

RR vs PBKS : रियानची अंडरआर्म बॉलिंग; अंपारयरने दिली वॉर्निंग (VIDEO)

222 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या संघातील भरवशाच्या फलंदाजांनी थोड्या थोडक्या धावा करुन तंबूचा रस्ता धरला. एकाबाजूने विकेट पडत असताना कर्णधार शेवटच्या षटकापर्यंत मैदानात उभा राहिला. त्याने सामन्यात ट्विस्ट आणले. निम्म्यापेक्षा अधिक धावा करुन त्याने विक्रमी शतक झळकावले. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बेन स्टोक्स, बटलर यांच्याशिवाय राहुल तेवतियाने मोक्याच्या क्षणी त्याची साथ सोडली. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंग त्याला रोखण्यात यशस्वी ठरला. 

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

आतापर्यंतच्या आयपीएल स्पर्धेत 108 सामन्यात संजू सॅमसनने 2703 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. पंजाबविरुद्धच्या संघात केलेली 119 धावांची खेळी त्याची आयपीएलच्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. त्याच्या नावे 13 अर्धशतकांचीही नोंद आहे.  यंदाच्या हंगामात राजस्थानच्या संघाला त्याच्याकडून मोठी आशा आहे. नेतृत्वासह फलंदाजीमध्ये तो पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या