सेहवागचं ट्वीट वाचून तुम्हीही व्हाल इमोशनल; चेतनला १० दिवस भावाच्या आत्महत्येबद्दल कल्पानच नव्हती

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021 : भारताचा माजी विस्फोटक खेळाडून विरेंद्र सेहवाग यानं चेतन सकारियाबाबद भावनिक ट्विट केलं आहे. हे ट्विट वाचून तुम्हीही इमोशन व्हाल...

IPL 2021 RR vs PBKS : आयपीएलच्या १४ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील नवोदित ताऱ्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. डावखुऱ्या हाताने जलदगती गोलंदाज चेतन सकारियाने मिळालेल्या संधीच सोनं केलं. चेतन यानं ४ षटकांत ३१ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट मिळवल्या.  देशांतर्गत क्रिकेटमधील लक्षवेधी कामगिरी आणि त्याच्या आयपीएलपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आणि तितकाच इमोशनल असाच आहे. भारताचा माजी विस्फोटक खेळाडून विरेंद्र सेहवाग यानं चेतन सकारियाबाबद भावनिक ट्विट केलं आहे. हे ट्विट वाचून तुम्हीही इमोशन व्हाल...विरेंद्र सेहवाग यानं साकरियाच्या आईची एक मुलाखत पोस्ट केली आहे. त्यासोबत सेहवाग लिहितो, 'चेतन सकारियाच्या भावानं गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत आपला जीव दिला होता. त्याच्या कुटुंबीयांनी १० दिवसांपर्यंत ही गोष्ट चेतनला सांगितली नाही. कारण, तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होता.  युवा खेळाडू आमि त्यांच्या कुटुंबीयांना क्रिकेट किती महत्वाचं आहे. खरेच अशा युवा खेळाडूंना आपलं स्वप्न करण्यासाठी आयपीएल मोठा मंच मिळाला आहे. यामधील काही जणांचा प्रवास तर असाधारण असतो.' 

हेही वाचा ; IPL 2021 : पंजाबच्या राहुलनं मोडला वॉटसनचा विक्रम

चेतनच्या आईनं एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाची कथा सांगितली आहे. चेतन यानं कोणत्या परिस्थितून इथंपर्यंत पोहचला याची आपभिती त्या माऊलीनं सुनावली आहे.  चेतनची आई म्हणते, 'आम्ही ज्या दु:खातून गेलो, तसे दु:ख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. काही दिवसापूर्वी माझा लहान मुलगा गेला त्यावेळी चेतन मुश्ताक अली करंडकात खेलता होता. आम्ही त्याला काहीच सांगितलं नाही. वडिलांना दहा दिवसांपासून बरं नाही बरे नाही, इतकेच सांगायचो. वडिलांच्या प्रकृत्तीबाबत तो वारंवार चौकशी करायचा.तेव्हा मी विषय बदलत असे. माझे पती सत्य सांगतील या भितीपोठी मी त्यांनाही त्याच्याशी बोलू देत नव्हते. एक दिवस मात्र मला रडू कोसळलं. भावाच्या आत्महत्येची बातमी कळताच चेतन आठवडाभर कोणाशीही बोलला नाही. दोघे भाऊ अतिशय जवळचे होते. एकमेंकाच्या सुख:दुखात धावून येत होते. त्यानंतर महिनाभरात चेतन आयपीएलसाठी करारबद्ध झाला. त्यावेळी स्वप्न पाहत असल्याचा भास झाला. आर्थिकदृष्ट्या आम्ही फारच खचलो होतो. '

आयपीएलच्या लिलावात 20 लाख मूळ किंमत असलेल्या सकारियाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी राजस्थानच्या संघाने 1.2 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या लिलावात मोठी रक्कम मिळाल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता. एका मुलाखतीमध्ये त्याने आपले वडिल ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले होते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आयपीएलचे दरवाजे खुले झाल्याचा उल्लेखही त्याने खास मुलाखतीवेळी केला होता. 

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

ऐकेकाळी त्याचे वडिल ट्रक चालवायचे. काही काळानंतर त्यांनी गुजरातमधील वरतेजमध्ये टेम्पो चालवण्याचे कामही केले. कुटुंबियांची अर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळ क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी चेतनकडे पैसे नसायचे. टीम सहकारी असलेल्या शेल्डन जॅकसनने यावेळी त्याची मदत केली. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने फी माफ केल्यामुळे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पुर्ण झाले, असेही त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.  

जडेजाचा सल्ला आणि आयपीएलमध्ये एन्ट्री 

डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारा चेतन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करतो. टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करणारा रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनादकट देखील याच संघाकडून खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटच्या पदार्पणातील सामन्यात ड्रेसिंग रुममधून मैदानात येत जडेजाने मदत केली होती, असा किस्साही त्याने शेअर केला होता. जडेजामुळे देशांतर्गत क्रिकेट ते आयपीएल प्रवास शक्य झाला, असेही चेतनने सांगितले होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या