IPL 2021 : नर्व्हस नाईंटी! सीमारेषेवर राहुल वर्सेस राहुल बघण्यासारखा सीन (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

शतकासाठी आवश्यक 13 धावा सहज करण्याचे संकेत त्याने पहिल्या चेंडूवर चौकार खेचून दिले. दुसऱ्या चेंडूवरही त्याने उत्तुंग फटका खेळला. अन्...

राजस्थान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुल शेवटच्या षटकापर्यंत खेळला. सलामीला येऊन त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. युएईतील मैदानात रंगलेल्या आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवून त्याने 50 चेंडूत 91 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार खेचले.  अखेरच्या षटकात संजूने चेंडू पहिला सामना खेळणाऱ्या चेतन साकारिया याच्या हाती सोपवला. स्ट्राईकवर असलेलला केएल राहुल यावेळी 87 धावांवर खेळत होता.

शतकासाठी आवश्यक 13 धावा सहज करण्याचे संकेत त्याने पहिल्या चेंडूवर चौकार खेचून दिले. दुसऱ्या चेंडूवरही त्याने उत्तुंग फटका खेळला. या चेंडूवर त्याला सहा धावा मिळाल्या असे वाटत असताना राहुल तेवतियाने चपळाई दाखवून सहा धावांसाठी सीमारेषेपलीकडे जाणारा चेंडू कॅचमध्ये रुपांतरीत केला. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेश राहुलचा राजस्थान रॉयल्सच्या राहुलने सीमारेषेवर उत्कृष्ट झेल टिपला. त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. त्याचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. हा झेल झाला नसता तर लोकेश राहुलने शतक सहज पूर्ण केले असते. 

 

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

शतकाला हुलकावणी मिळाली असली तरी  वानखेडेच्या मैदानातील किंग असल्याचेच केएल राहुलने दाखवून दिले. आयपीएल स्पर्धेतील मागील तीन सामन्यात वानखेडेवर त्याने कमालीची खेळी केलीय. यापूर्वी वानखेडेच्या मैदानात खेळलेलेल्या सामन्यात त्याने 60 चेंडूत 94 धावा आणि 64 चेंडूत 100 धावा अशी खेळी केली होती. वानखेडेवरील सलग तिसऱ्या सामन्यात त्याने 50 चेंडूत 91 धावांची दमदार खेळी केली.  


​ ​

संबंधित बातम्या