IPL 2021 : जे 13 वर्षांत जमलं नाही ते RCB नं यंदा करुन दाखवलं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

यंदाच्या हंगामात धमाका करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला असून स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यातील कामगिरीनंतर संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसतोय.  

IPL 2021, RCB vs KKR : विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने (Royal Challengers Bangalore) यंदाच्या हंगामाची सुरुवात अगदीच झोकात केलीय. तीन वेळा फायनलमध्ये पोहचूनही चॅम्पियनचा रुबाब मिरवण्यात संघाला अपयश आले. 13 वर्षांचा दुष्काळ संपवून जेतेपदाच्या शर्यतीतील आपली दावेदारी भक्कम केलीय. यंदाच्या हंगामात धमाका करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला असून स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यातील कामगिरीनंतर संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसतोय.  

आरसीबीने रविवार झालेल्या सामन्यात दोन वेळा आयपीएल चॅम्पियनशिप मिळवलेल्या कोलकाता नाईट  रायडर्सला (Kolkata Knight Riders) एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात आरसीबीने विजयी हॅटट्रिक नोंदवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरुवातीच्या तिन्ही मॅचेस जिंकल्या आहेत. 

एकतर्फी सामना

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना हा एकतर्फी झाला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर विराटच्या पदरी निराशा आली. तो अवघ्या 50 धावा करुन परतल्यानंतर रजत पटिदार आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात माघारी फिरले. रॉयल चॅलेंजर्स संकटात सापडणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मॅक्सवेल आणि एबीच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने द्विशतकाला गवसणी घातली. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 166 धावांवरच आटोपला.

बंगळुरुने हा सामना 38 धावांनी जिंकत पहिल्यांदा आयपीएलच्या स्पर्धेत तीन सामने जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. आरसीबीने पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायझर्सला नमवले आणि आता कोलकातावर एकहाती विजय मिळवत या सीझनमधील किंग होण्याचे संकेतच दिले आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या