'हिटमॅन' रोहित शर्मा भारताचा नवीन 'सिक्सर किंग', मोडला धोनीचा रेकॉर्ड

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 April 2021

IPL 2021 रोहित शर्मानं झटपट 32 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं दोन खणखणीत षटकार लगावत

Rohit Breaks Dhoni Most Sixes Record : आयपीएलमधील नवव्या सामन्यात हैदराबाद संघानं पुन्हा एकदा नांगी टाकली. हैदराबाद संघाचा स्पर्धेतील हा लागोपाठ तिसरा पराभव होय. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डिकॉक 40 आणि रोहित शर्माच्या 32 धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पोलार्डने अखेरच्या षटकात 22 चेंडूत 35 धावा करत मुंबईच्या धावफलकावर 150 धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ 137 धावांत आटोपला. रोहित शर्मानं झटपट 32 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं दोन खणखणीत षटकार लगावत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहित शर्मा आता आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला भारतीय खेळाडू झाला आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. रोहित शर्माच्या नावावर 217 षटकारांची नोंद आहे. धोनीच्या नावावर 216 षटकार असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 351 षटकार आहेत. गेलनं 134 सामन्यात 351 षटकारांचा पाऊस पाडला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या डिव्हिलिअर्स यानं  171 सामन्यात 237 षटकार लगावलेत.  

रोहित शर्माचं आयपीएल करिअर 
रोहित शर्माने 203 आयपीएल सामन्यात 31.31 च्या सरासरीनं  5324 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं एक शतक आणि 39 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच 15 विकेटही घेतल्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या