RR vs PBKS : रियानची अंडरआर्म बॉलिंग; अंपारयरने दिली वॉर्निंग (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

यंदाच्या हंगामात सनरायझर्सच्या ताफ्यात असलेल्या केदार जाधवच्या गोलंदाजी शैलीप्रमाणे एक चेंडू टाकला.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात पंजाबने धावांची बरसात केली.  कर्णधार केएल राहुल, गेल आणि दीपक हुड्डा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 200 + धावा केल्या. केएल राहुल आणि ख्रिस गेल यांची सेट झालेली जोडी रियान परागने फोडली. गेलला बाद करण्यापूर्वी परागने अजब-गजब पद्धतीने गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. 

राजस्थानचा फिरकीपटू रियान परागने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेला आणि यंदाच्या हंगामात सनरायझर्सच्या ताफ्यात असलेल्या केदार जाधवच्या गोलंदाजी शैलीप्रमाणे एक चेंडू टाकला. मैदानातील पंचानी त्याला  वॉर्निंग दिल्याचेही पाहायला मिळाले.  केदार जाधव ज्या शैलीत गोलंदाजी करतो अगदी तशाच शैलीत परागने गोलंदाजी केली असली तरी त्याचा हात खूपच खालून फिरला होता. त्यामुळेच त्याला पंचांनी ताकीद दिली. त्यानंतर त्याने व्यवस्थित आपल्या शैलीत गोलंदाजी केली. आणि गेलची विकेटही काढली.  क्रिकेट नियमानुसार, गोलंदाजी करताना हात हा खांद्याच्या लेवलने फिरवावा लागतो.  

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

ख्रिस गेलचे लक्ष विचलित करण्याचा परागचा प्लॅन मात्र यशस्वी ठरला.  या ट्रिकनंतर  पाचव्या चेंडूवर गेल उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या आहेत. यात कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. दीपक हुड्डानेही अर्धशतकी खेळी करुन संघाच्या धावसंख्येत भर घातली. 


​ ​

संबंधित बातम्या