IPL 2021: माही भाईकडून शिकलो तेच त्याच्या विरुद्ध ट्राय करेन : पंत

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 6 April 2021

दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून पंतने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याविषयी निर्माण झालेली उत्सुकता बोलून दाखवलीये.

IPL 2021: युएईच्या मैदानात फायनलमध्ये धडक मारलेल्या पण उप विजेतपदावर समाधान मानावे लागलेल्या दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रंगणार आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या नेतृत्वाची धूरा पंतच्या खांद्यावर असून  (DC vs CSK)  धोनी वर्सेस पंत असे चित्र या लढतीवेळी पाहायला मिळणार आहे. ज्या कॅप्टनकडून खूप काही शिकायला मिळाले त्याच्या विरुद्ध कॅप्टन्सी करायला पंत उत्सुक आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून पंतने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याविषयी निर्माण झालेली उत्सुकता बोलून दाखवलीये. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या लढतीसाठी उत्सुक आहे. दिग्गजाकडून मिळालेल्या शिकवणीच्या जोरावर चेन्नईविरुद्धचा सामना जिंकू, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.  

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

पंत म्हणाला की,  ‘‘कॅप्टनच्या रुपात आयपीएलमधील पहिला सामना माही भाईच्या (महेंद्रसिंह धोनी) विरुद्ध आहे. हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव असेल. मी त्याच्याकडून खूप काही शिकलोय. एक खेळाडू म्हनून माझ्या अनुभवाचाही या सामन्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करीन." धोनीकडून जे काही शिकलो त्याचा वापर करुन चेन्नई विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेन, असा उल्लेखही त्याने केला.  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चढ-उताराचा सामना केल्यानंतर सध्याच्या घडीला पंत कारकिर्दीतील सर्वोच्च शिखरावर पोहचलाय. पंतकडे धोनीचा वारसदार म्हणूनही पाहिले जाते. धोनीसोबत होणारी तुलना आवडते पण मला स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे, असे पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर म्हटले होते. फलंदाजीमध्ये परिपक्वता दाखवलेल्या पंतला विकेटमागे अजून परिपक्व व्हायचे आहे. त्यात आता नेतृत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली असून या संधीच सोन करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.  

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

पंतने  मुख्य कोच रिकी पाँटिंग यांच्याविषयी देखील भाष्य केले. मागील दोन-तीन वर्षांपासून पाँटिंग दिल्ली कॅपिटल्स संघासोबत आहेत. त्यांनी संघबाधणीसाठी महत्त्वाची आणि उत्तम भूमिका बजावली असून ते संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करत असता. रिकी आणि इतर सहाकाऱ्यांच्या मदतीने जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरु, असेही पंतने म्हटले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या