IPL 2021 : नवरा-बायकोतील इमोशनल सीन; फोटो होतोय व्हायरल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

कोलकाता नाइट राइडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात युजीनं दोन विकेट्स घेतल्या. नितीश राणाच्या रुपात त्याने यंदाच्या हंगामातील आपली  पहिली शिकार केली.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021)  च्या 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या टीमने सलग तिसरा सामना जिंकलाय. विजयाच्या हॅटट्रिकसह रायल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत टॉपला पोहचला आहे. यंदाच्या हंगामात RCB कडून शंभर सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे करणारा युजवेंद्र चहल पहिल्या दोन मॅचमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरला होता. त्याच्या विकेटचा दुष्काळ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या लढतीत संपुष्टात आला. 

कोलकाता नाइट राइडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात युजीनं दोन विकेट्स घेतल्या. नितीश राणाच्या रुपात त्याने यंदाच्या हंगामातील आपली  पहिली शिकार केली. चहलने विकेट मिळवल्यानंतर हा सामना पाहण्यासाठी स्टेडिमयवर उपस्थिीत असलेली त्याची पत्नी धनश्री भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. धनश्री वर्माचा इमोशन फिलिंगवाला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजवेंद्र चहलने या सामन्यात दोन विकेट घेतल्या. नितेश राणाशिवाय दिशेन कार्तिकला त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. 

IPL 2021 : रसेलनं जाणूनबुजून धावबाद नाही केलं? पाहा Video

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गत हंगामाप्रमाणे यंदाच्या हंगामातील स्पर्धेसाठी बायोबबलचे वातावरण तयार करण्यात आले आहे. सर्व खेळाडू बायोबबलमध्ये असून अनेक खेळाडूंनी फॅमिलसह बायोबबलमध्ये राहण्यास पसंती दिलीये. आरसीबीच्या प्रत्येक सामन्यात धनश्री स्टेडियममध्ये हजेरी लावताना दिसते.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग केली होती. मॅक्सवेल आणि एबीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 204 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या एकाही गड्याला मोठी खेळी करता आली नाही. आंद्रे रसेलची 31 ही धावसंख्या सर्वोच्च होती. परिणामी कोलकाताचा संघ 8 बाद 166 धावांपर्यंतच मजल मारु शकला. 
 


​ ​

संबंधित बातम्या