IPL 2021 : MI विरुद्ध RCB च्या हर्षल पटेलचा रेकॉर्ड; निम्मा संघ एकट्यानं केला गारद

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने ट्रेंडिग विंडोच्या माध्यमातून हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिले होते.

IPL 2021 Harshal Patel  5 Wickets Record against Mumbai Indians : चेन्नईच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या हर्षल पटेलनं मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी नोंदवली. त्याने मुंबईचा अर्धा संघ गारद करुन आयपीएलमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केलाय. मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट घेण्याचा पराक्रम करणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ 9 बाद 159 धावांवर आटोपला.  

पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या पाच गड्यांना हर्षल पटेलने तंबूत धाडले. मुंबई इंडियन्स 3 बाद 135 धावा असताना 30 वर्षीय हर्षल पटेलने मुंबईच्या भरवशाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले.  16 व्या षटकात त्याने हार्दिक पांड्याला 13 धावांवर तंबूत धाडले.  ईशान किशन (28), केरॉन पोलार्ड (7), क्रुणाल पांड्या (7) आणि मारको जेनसनला त्याने खातेही उघडू दिले नाही. आपल्या 4 षटकांच्या कोट्यात त्याने 27 धावा खर्च करुन 5 गडी बाद केले.  आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ गारद करण्याचा पराक्रम करणारा तो पहिला गोलंदाज आहे.  

IPL 2021: सेंच्युरी करुन कोहलीला इम्प्रेंस करणाऱ्या गड्याला मिळाली पदार्पणाची संधी

ट्रेडिंग विंडोच्या माध्यमातून बंगळुरुच्या ताफ्यात 

आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने ट्रेंडिग विंडोच्या माध्यमातून हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिले होते. हर्षलसोबत डेनियल सॅम्सलाही त्यांनी बंगळुरुला सोपवले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 12 खेळाडूंना रिटेन केले होते. तर 9 खेळाडूंना रिलीज केले होते. हर्षल पटेलची पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहून त्याला सोडल्याची खंत त्यांना निश्चितच वाटत असेल.  


​ ​

संबंधित बातम्या