विराटची चिंता वाढली, आता अष्टपैलू खेळाडूला झाली कोरोनाची लागण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 : चेन्नईच्या मैदानात ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात यंदाच्या हंगामाचा पहिला सामना होणार आहे

IPL 2021 : चेन्नई - IPL च्या १४ वा हंगाम अवघ्या दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे. चेन्नईच्या मैदानात ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात यंदाच्या हंगामाचा पहिला सामना होणार आहे. स्पर्धेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना आरसीबीच्या संघासाठी चिंतेत भर घालणारी बातमी आली आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनिअल सॅम्स याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याआधीच सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कल याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दवत्तनं नुकतीच कोरोनावर मात केली होती. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला करोनानं गाठलं आहे. 

हेही वाचा  - IPL 2021 : मॅक्सवेलनं असा दूर केला क्वारंटाईनचा थकवा! (VIDEO)
 
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघानं आपल्या अधिकृत ट्विटरवर डिनिअल सॅम्सला कोरोनाची लागण झाल्याचं कळवलं आहे. आरबीसीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की,  डॅनिअल सॅम्सनं तीन तारखेला चेन्नईच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आज सात एप्रिल रोजी डॅनिअल सॅम्सचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॅनिअल सॅम्समध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नसून तो विलगीकरणात आहे. डॉक्टराचं पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. आरसीबी आणि डॅनिअल सॅम्स बीसीसीआयनं घालून दिलेले सर्व कोरोना नियम पाळत आहे.

अद्याप एकदाही आयपीएल न जिंकलेल्या आरसीबीची विजेतेपदासाठी प्रत्येक हंगामात धडपड सुरु आहे. संघाच्या फलंदाजीची धुरा फक्त विराट आणि डिव्हिलियर्स या दोघांवरच होती. त्यांच्यावरचा दबाव कमी व्हावा यासाठी फलंदाज घेण्याकडे टीमचा कल आहे. यंदाच्या हंगामासाठी आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल याला ट्रेड्सद्वारे आपल्या संघात घेतलं आहे. डॅनियल सॅम्सची आयपीएलमधील कामगिरी तितकीशी चांगली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत त्यांनी धमाल केली होती. 

हेही वाचा: रोहितसह मुंबईच्या खेळाडूंनी मराठी गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हिडिओ

आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव

भारतीय संघाचे माजी विकेट किपर आणि मुंबई इंडियन्ससाठी प्रतिभावंत खेळाडू शोधणाऱ्या किरण मोरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे. 58 वर्षीय किरण मोरे पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकवणाऱ्या संघातील यष्टीरक्षक सल्लागार म्हणूनही काम पाहतात. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं नसली तरी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली आहे.  मुंबई इंडियन्सच्या निवेदनानुसार, किरण मोरे मुंबई इंडियन्स मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहेत. बीसीसीआयच्या नियमावलीचे ते पालन करतील. किरण मोरे हे संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील धकधक निश्चितच वाढली आहे.


​ ​

संबंधित बातम्या