IPL 2021 : जड्डूची कमाल; गेलचा झेल आणि राहुलचा गेम (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात दिपक चाहरच्या गोलंदाजीवर गेल स्ट्राईकवर होता. चेंडू खेळण्यात त्याला अपयश आले.

IPL 2021, PBKS vs CSK Match : पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या  संघाने दमदार सुरुवात केली. दिपक चाहर आणि रविंद्र जडेजाच्या कामगिरीच्या जोरावर चेन्नईने पंजाबच्या संघाला सुरुवातीला धक्के दिले. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात 91 धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून देणाऱ्या लोकेश राहुलकडून पंजाबला अपेक्षा होत्या. मात्र मयांक अगरवाल बाद झाल्यानंतर गेल आणि राहुल यांच्यातील ताळमेळ ढासळला. मिळालेल्या संधीचा जडेजाने चपळाईने फायदा उचलत केएल राहुलला तंबूत धाडले. 

पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात दिपक चाहरच्या गोलंदाजीवर गेल स्ट्राईकवर होता. चेंडू खेळण्यात त्याला अपयश आले. पॅडला लागून चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गेल्यानंतर नॉन स्ट्राईकला असलेल्या केएल राहुलने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.  अष्टपैलू आणि क्रिकेट जगतातील चपळ फिल्डर असलेल्या रविंद्र जडेजाच्या हातात चेंडू गेल्याचा केएल राहुलला बहुदा विसर पडला असावा. तेच पंजाबच्या कर्णधाराला महागात पडले. रविंद्र जडेजाने जबरदस्त डायरेक्ट हिट करत राहुलला तंबूत धाडले. ही चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठे यश होते. 

IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'

 
पंजाबच्या धावफलकावर 19 धावा असताना क्रिस गेलच्या रुपात संघाला तिसरा आणि मोठा धक्का बसला. गेल 10 धावा करुन परतला. दिपक चाहरच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने त्याचा उत्तम झेल टिपला. रन आउटनंतर फिल्डिंगच्या जोरावर अप्रतिम कॅचच्या रुपात जडेजाने चेन्नईला दोन महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या. 

 

 


​ ​

संबंधित बातम्या