पृथ्वीच्या तुफानी फटकेबाजीवर प्रेयसी फिदा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

उघडपणे दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावरील त्यांच्यापोस्टमुळे चर्चेला उधान आलं.

दिल्लीच्या ताफ्यातून खेळणाऱ्या मुंबईकराने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा हिट शो दाखवून छोटा पॅक मोठा धमाका करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. युएईच्या मैदानात झालेल्या आयपीएल स्पर्धेत पृथ्वीला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. 13 सामन्यात त्याने 2 अर्धशतकाच्या मदतीने 228 धावा केल्या होत्या. युएईच्या मैदानात तो चांगलाच संघर्ष करताना दिसला. युएईतून त्याला टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाण्याचे तिकीट मिळाले. पण बॅट आणि पॅडमध्ये मैलाच अंतर ठेवून खेळणं त्याला चांगलच महागात पडलं. सातत्याने मिळालेल्या संधीनंतरही फ्लॉपशोमुळे त्याने टीम इंडियातील स्थान गमावले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशजनक कामगिरीनंतर पृथ्वीने विजय हजारे स्पर्धा गाजवली. विजय हजारे ट्रॉफीत 165.40 च्या सरासरीने पृथ्वीनं 827 धावा कुटल्या. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट 138.29 एवढा होता. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 72 धावांची दमदार खेळी केली. शनिवारी दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पृथ्वी शॉची फलंदाजी सर्वांना भाळणारी होती. त्याची प्रेयसी म्हणून चर्चेत असणाऱ्या प्राची सिंग हिनेही दिल्लीच्या सलामीवीरासाठी खास मेसेज दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राची सिंग आणि पृथ्वी शॉ डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. उघडपणे दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावरील त्यांच्यापोस्टमुळे चर्चेला उधान आलं.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तुफानी फटकेबाजी केल्यानंतर प्राची सिंग हिनं पृथ्वी शॉच्या नावाबरोबर हार्ट इमोजी पोस्ट करत कौतुक केलं. प्राचीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं की, 'शॉ यानं काय मस्त सुरुवात केली.' यासोबतच प्राचीनं हार्टचं इमोजी पोस्ट केलं.'

अभिनेत्री प्राची सिंग उडान या प्रसिद्ध टेलिव्हिजन सिरीयलमध्ये झळकल्यानंतर तिची चांगलीच ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर आता पृथ्वी शॉच्या अलीकडील इन्स्टाग्राम पोस्टवर तिने केलेल्या कमेंट्समुळे ती आणि पृथ्वी शॉ हे दोघे मित्रांपेक्षा अधिक असल्याची चर्चा सुरु झाली.

आयपीएल 13च्या हंगामात खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉने  दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही गमावले होते. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एडीलेड टेस्ट 0 आणि 4 धावांवर बाद झाल्यानंतर त्याला बाकावरच बसण्याची वेळ आली. बॅट-पॅडमधील अंतरामुळे होणारी टेक्निकली चूक दुरुस्त करुन तो यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झालाय.  


​ ​

संबंधित बातम्या