IPL 2021 Points Table : पहिल्या आठवड्यानंतर आरसीबी अजेय; चेन्नईची मोठी झेप 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 April 2021

IPL 2021 Points Table : अजय असणारा विराट कोहलीचा आरसीबी संघ अव्वल स्थानावर तर दोन्ही सामन्यात पराभव पाहणारा हैदराबादचा संघ तळाशी

IPL 2021 Points Table : आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होऊन आठवडा उलटला आहे. विराट कोहलीचा आरसीबी आणि  रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघामध्ये 9 एप्रिल रोजी सलामीची सामना झाला होता. त्यानंतर आठवडभरात प्रत्येक संघाचे प्रत्येकी दोन-दोन सामने झाले आहेत. आयपीएलच्या पॉइंट टेबलवर नजर मारल्यास अजय असणारा विराट कोहलीचा आरसीबी संघ अव्वल स्थानावर तर दोन्ही सामन्यात पराभव पाहणारा हैदराबादचा संघ तळाशी असल्याचं दिसतेय. दुसऱ्या सामन्या विजय मिळवत पुनरागम करणाऱ्या चेन्नईनं गुणतालिकेत मुंबईला मागे टाकलं आहे. 

पहिल्या स्थानावर असणाऱ्या आरसीबीनं आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर तळाशी असणाऱ्या हैदराबाद संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इतर संघानं प्रत्येकी एक सामना गमावला तर एका सामन्यात विजय संपादन केला आहे. चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रोहितचा मुंबई तिसऱ्या. 

पाहा पॉइंट टेबल -

IPL Purple Cap : आयपीएलच्या 8 सामन्यानंतर आरसीबीच्या हर्षल पटेल याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. हर्षलन दोन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रसेलनं सहा तर तिसर्या क्रमांकावर असणाऱ्या आवेश खान यानं पाच विकेट घेतल्या आहेत.  

IPL Oragne Cap : कोलकाता नाइट राइडर्सचा नितीश राणा याच्याकडे ऑरेंज कॅप असून त्यानं दोन सामन्यात 137 धावांचा पाऊस पाडला आहे.  123 धावांसह संजू सॅमसन दुसऱ्या तर 99 धावांसह मनिष पांडे तिसर्या क्रमांकावर आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या