IPL 2021 : ओपनिंग सेरेमनी नाही; पण काहींना खास निमंत्रण

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी युएईच्या मैदानात रंगलेल्या स्पर्धेतही ओपनिंग सेरेमनी घेण्यात आली नव्हती. 

IPL 2021 : चेन्नईच्या मैदानातून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 14 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धेचे रणशिंग फुंकणार आहेत. आयपीएच्या शुभारंभाच्या सामन्यात  ओपनिंग सेरेमनी (IPL 2021 opening ceremony) होणार नाही. बीसीसीआय (BCCI) ने पहिल्यांदाचा ओपनिंग सामन्यासाठी काही खास लोकांना निमंत्रित केले आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा लोकप्रिय स्पर्धा ही ओपनिंग सेरेमनीशिवाय सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी युएईच्या मैदानात रंगलेल्या स्पर्धेतही ओपनिंग सेरेमनी घेण्यात आली नव्हती. 

IPL 2021 - परिपूर्ण संघाकडून अजून अपेक्षा; मुंबईसमोर आव्हान काय?

यंदाच्या हंगामात ग्रँड सेरेमनी होणार नसली तरी काही खास लोक पहिल्या सामन्यावेळी उपस्थितीत राहतील.  क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाला बीसीसीआयचचे सचिव जय शाह यांनी निमंत्रित केले आहे. याशिवाय व्हीलचेअर क्रिकेट इंडियालाही सामन्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सर्व राज्यांचे सदस्य ओपनिंग सामन्याला हजर राहतील. दुसरीकडे बीसीसीआयने मीडियालाही नो एन्ट्रीची पाटी लावलीय.  

धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

बीसीसीआयच्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीमुळे मीडियाला मॅच कव्हर करण्यासाठी किंवा प्रॅक्टिस दरम्यान स्टेडियमच्या आवारात प्रवेश देण्यात येणार नाही. बीसीसीआयकडून मीडियासाठी प्रत्येक सामन्यानंतर ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आयपीएल 2021 च्या हंगामातील सर्व सामने सहा ठिकाणी नियोजित करण्यात आले आहेत.  दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या ठिकाणी स्पर्धा रंगणार असून  30 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल खेळवण्यात येईल. कोणत्याही टीमला घरच्या मैदानाचा फायदा घेता येणार नाही. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक सामने चेन्नईच्या मैदानात खेळणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या