IPL 2021: चेन्नईच्या ताफ्यातील सदस्यालाही कोरोना

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीही महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघासमोर कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.  

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) च्या ताफ्यातील एका सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. आयपीएलच्या स्पर्धेपूर्वी येणारे पॉझिटिव्ह रिपोर्ट आयोजकांची चिंता वाढवणारे आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएलची संपूर्ण स्पर्धा ही युएईच्या मैदानात झाली होती. युएईला दाखल झाल्यानंतरही चेन्नईच्या संघातील स्टाफ सदस्य आणि काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीही महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघासमोर कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.  

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का; अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,  चेन्नई सुपर किंग्जच्या कंटेट टीमच्या सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. श शनिवारी समोर आलेल्या रिपोर्टनंतर संबंधित सदस्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती टीममधील इतर कोणाच्याही संपर्कात आली नसून इतर खेळाडू सुरक्षीत असल्याचे टीम मॅनेजमेंटने म्हटले आहे. एवढेच नाही तर सर्व खेळाडू प्रोटोकॉलचा नियमावलीचे पालन करत असून खेळाडूंचा सराव सुरुच राहणार असल्याचे समजते.  
 
मागील हंगामात सीएसकेच्या ताफ्यातील 13 सदस्य कोरोनाच्या जाळ्यात सापडले होते. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील अक्षर पटेलसह वानखेडे स्टेडियवरील ग्राउंड स्टाफ संदस्यापैकी 8 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली होती. 


​ ​

संबंधित बातम्या