IPL 2021 : मुंबईत खेळा, पण नियम पाळा; राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 5 April 2021

यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनसह बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलचे मुंबईतील सामने नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकारची भूमिकाही स्पष्ट झाली आहे.  

आयपीएल स्पर्धेतील मुंबईतील सामन्यावर वीकेंड लॉकडाऊनचा कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारने मुंबईतील सामन्याला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. एएनआयच्या वृत्तानुसार, कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन सामने खेळण्याला परवानगी देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. मुंबईच्या मैदानात रंगणारे सामने हे प्रेक्षकाविना होतील. आयपीएलमध्ये जे सहभागी आहेत त्यांनी प्रोटोकॉलनुसार विलीगीकरणाचे पालन करणे, अधिक गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे या निर्बंधासह मुंबईतील सामन्याला परवानगी देण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.  

Video : रडीचा डाव! डिकॉकनं फखर झमानला गंडवलं; काय सांगतो नियम?

त्यामुळे राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी मुंबईतील वानखेडेच्या मैदानात होणाऱ्या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनसह बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलचे मुंबईतील सामने नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकारची भूमिकाही स्पष्ट झाली आहे.  

RSAvsPAK : झमानचं द्विशतक हुकलं; दक्षिण आफ्रिकेनं पाकला रोखलं

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यभरात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर रात्री 8  ते सकाळी 7 वाजेपर्यंत  कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात स्पर्धेतील 5 संघ  10 सामने खेळणार आहते. मुंबईतील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 10 ते 24 एप्रिल दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स  हे संघ मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर सामने खेळणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या