IPL 2021; MIvsRCB : मॅक्सवेलचा 'मरिना बीच'वाला सिक्सर पाहून विराटही झाला आवाक (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

रॉयल चॅलेंजर्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या मॅक्सवेलने आपल्या भात्यातील तडाखेबाज फटेकेबाजीची झलक दाखवून दिली.

IPL 2021 Mumbai vs Bangalore, 1st Match : मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने नवा प्रयोग केल्याचे पाहायला मिळाले. किंग कोहलीने वॉशिंग्टनच्या साथीने संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर 36 धावा असताना वॉशिंग्टनच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. त्यानंतर रजित पाटीदारची विकेट पडली. त्यानंतर यंदाच्या हंगामात मोठी किंमत मोजून ताफ्यात सामील केलेल्या मॅक्सवेलला त्याने बढती दिली. ग्लेन मॅक्सवेलने विराटचा विश्वास सार्थ ठरवत कर्णधारासोबत 50 + धावांची भागीदारीही केली.

रॉयल चॅलेंजर्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या मॅक्सवेलने आपल्या भात्यातील तडाखेबाज फटेकेबाजीची झलक दाखवून दिली. त्याने 28 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 39 धावांची उपयुक्त खेळी केली. डावातील दहाव्या षटकातील क्रृणाल पांड्याच्या अखेरच्या चेंडूवर त्याने मारलेला षटकार डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. मरिना बीचच्या दिशेने 100 मीटर उत्तुंग मारलेला फटका पाहून कोहलीही आवाक झाल्याचे पाहायला मिळाले. 

 

मॅक्सवेल याला संघात घेण्यासाठी मागील वर्षांपासून प्लॅन करत होतो. यंदाच्या हंगामात त्याला आमच्या संघात सामील करुन घेण्यात यश मिळाले. तो एक सर्वोत्तम खेळाडू असल्याचे मत विराट कोहलीने सामन्यापूर्वी व्यक्त केले होते. मॅक्सवेलने कोहलीला जे अपेक्षित होते अगदी तशीच खेळी केली. मुंबई इंडियन्


​ ​

संबंधित बातम्या