IPL 2021, MIvsSRH Match Highlights : MI म्हणजे 'डेथ ओव्हर्सचा डेंजर झोन' (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

अखेरच्या 24 चेंडूत त्यांना विजयासाठी 31 धावा बाकी असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधाराने चेंडू आपल्या डेथ ओव्हर्स स्पेशलिस्टकडे सोपवला. आणि त्यांचा गेम झाला. 

चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेरच्या पाच षटकात मॅच आपल्या बाजूने वळवली. टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यावर सनरायझर्सच्या हैदराबादच्या गोलंदाजांनी तगडी बॅटिंग लाईन असलेल्या मुंबई इंडियन्सला 150 धावांत आटोपले. एवढेच नाही तर डेविड वॉर्नर आणि बेयरस्टो यांनी हैदराबादच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण मुंबई इंडियन्सने आपल्या तोऱ्यात अखेर मॅचवर विजयी मोहर उमटवली. 

 

कृणाल पांड्याने बेयरस्टोची विकेट घेत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्याने 67 धावांची भागीदारी केली. राहुल चाहरने मध्यफळीतील  मनिष पांड्येला स्वस्तात आटोपले. त्यानंतर हार्दिक पांड्याने वॉर्नरला रन आउट करत मुंबईला सामन्यात आणले. 16 षटकात सनरायझर्स हैदराबादने 5 बाद 120 धावा केल्या होत्या.  24 चेंडूत त्यांना विजयासाठी 31 धावा बाकी असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधाराने चेंडू आपल्या डेथ ओव्हर्स स्पेशलिस्टकडे सोपवला. आणि त्यांचा गेम झाला. 

IPL 2021, SRH vs MI : IPL 2021 : सुर्या-रोहितसमोर विजय शंकर जिंकला! (VIDEO)

पुढील 24 चेंडूतील 22 चेंडूतचे हैदराबादचा डावा खल्लास झाला. यात बोल्टने 3 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने रन आउटच्या स्वरुपात घेतलेली विकेट आणि बुमराहने घेतलेली विजय शंकरच्या विकेटचा समावेश आहे. 


​ ​

संबंधित बातम्या