VIDEO : चेन्नईमध्ये जॉनी बेयरस्टोची 'त्सुनामी', षटकारानं फोडल्या काचा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 April 2021

IPL 2021 : बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता.

IPL 2021 : 151 धावांचा पाठलाग करताना कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) हैदराबाद संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावा केल्या. जॉनी बेयरस्टो हिट विकेट झाल्यानंतर हैदराबाद संघाचं पतन होण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर जॉनी बेयरस्टो नावाची त्सुनामी आली होती. जॉनी बेयरस्टोने आपल्या छोटेखानी खेळीत षटकारांचा पाऊस पाडला होता. मुंबईचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला जॉनी बेयरस्टोने टार्गेट करत धुलाई केली होती. तिसऱ्या षटकांत जॉनी बेयरस्टोने तीन चौकार आणि एक षटकार लगावत बोल्टची हवा काढली होती.  

151 धावांचा पाठलाग करताना जॉनी बेयरस्टोने मुंबईच्या ट्रेंट बोल्टची यथेच्छ धुलाई केली. डावाच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावले. त्यानंतर तिसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने सिमारेषेबाहेर पाठवला. या षटकाराची लांबी 99 मीटर होती. बेयरस्टोनं लगावलेल्या षटकारामुळे डगआउटजवळ ठेवलेल्या फ्रीजच्या दरवाजा तुटून काचाचे तुकडे तुकडे झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  बेयरस्टोने पुढील चेंडूवर चौकार लगावत हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली. पण बेयरस्टोची तुफानी फलंदाजी हैदराबादचा पराभव रोखू शकला नाही. बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. क्रुणाल पंड्याच्या गोलंदाजीदरम्यान बेयरस्टो हिट विकेट झाला अन् वादळ शांत झालं.  हैदराबाद संघाचा डाव 19.4 षटकात 137 धावांवर संपुष्टात आला. मुंबईनं हा सामना 13 धावांनी जिंकला. (हेही वाचा : पोलार्डचा 105 मीटरचा गगनचुंबी षटकार, गोलंदाज राहिला पाहातच; पाहा Video)

पाहा बेयरस्टोचा खणखणीत षटकार -

 मुंबईचा विजय - 
आयपीएलमधील नवव्या सामन्यात हैदराबाद संघानं पुन्हा एकदा नांगी टाकली. हैदराबाद संघाचा स्पर्धेतील हा लागोपाठ तिसरा पराभव होय. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डिकॉक 40 आणि रोहित शर्माच्या 32 धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पोलार्डने अखेरच्या षटकात 22 चेंडूत 35 धावा करत मुंबईच्या धावफलकावर 150 धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ 137 धावांत आटोपला. 


​ ​

संबंधित बातम्या