मुंबईची परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन कायम; पहिला सामना देवाला!

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

IPL 2021 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2013 पासून मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत विजय मिळवता आलेला नाही. 

IPL 2021 : मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील पहिल्या लढतीनं आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात झाली आहे. सलामीच्या लढतीत विराट कोहलीच्या आरसीबी संघानं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाचा अवघ्या दोन विकेटनं पराभव केला. या विजयासाह विराट कोहलीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयानं केली. पण दुसरीकडे रोहित शर्माच्या मुंबईनं दरवर्षीप्रमाणे हंगामाची सुरुवात पराभवानं झाली आहे. मुंबईच्या पराभवानंतर अनेंकानी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईच्या चाहत्यांनी पराभवानंतर आपला पहिला सामना देवाला अशा प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्स मागील ९ हंगामात सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागलाय.  मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जेतेपद मिळवले आहे. यंदाच्या हंगामात ते सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.  चॅम्पियन होण्याची हॅटट्रिक करण्यासाठी त्यांच्याकडे खूप वेळ आहे, पण जर सलामीच्या सामन्यात सातत्यपूर्ण पराभवाची मालिका खंडीत करता आली नाही. शुक्रवारी चेपॉकच्या मैदानात सलामीच्या सामन्यात मुंबईला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2013 पासून मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत विजय मिळवता आलेला नाही. 

धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि  मुंबई इंडियन्स यांच्यात 4 एप्रिल 2013 मध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाला 2 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित 20 षटकात 156 धावा केल्या होत्या. यात ख्रिस गेलने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली होती. मुंबई इंडियन्सने सलामीजा सामन्यातील पराभवानंतर फायनल जिंकली होती.   

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 16 एप्रिल 2014 मध्ये रंगलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबईला 41 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. या हंगामात चेन्नईने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास केला होता.  2015 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध  मुंबई इंडियन्स असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.  या हंगामात मुंबईने दुसरी ट्रॉफी जिंकली होती. पण कोलकाता विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 168 धावांचे टार्गेट पार करताना गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील संघाने 9 चेंडू आणि 7 विकेट राखून जिंकला होता.  

हेही वाचा ; MIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

2016 च्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सन्ला रायझिंग पुणे सुपर जाएंट्स संघाने 9 विकेट्स राखून पराभूत केले होते. हरभजन सिंगने केलेल्या 45 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 100 चा आकडा पार केला. पुणे संघाने 5 ओव्हर्स राखून त्यांना सहज पराभूत केले होते.  2017 च्या हंगामात पुणे संघाने मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा सलामीच्या सामन्यात पराभूत केले. 184 धावा करुनही पुण्याच्या संघाने मुंबईला पराभूत केले होते. पुण्याकडून अजिंक्य रहाणे 34 चेंडूत 60 धावा आणि स्मिथने 54 चेंडूत 84 धावांची खेळी केली होती. सलामीच्या लढतीत पराभूत होऊन मुंबईने जेतेपद पटकावले होते. 

2018 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईला पराभूत केले. यावेळी ड्वेन ब्रावोने 30 चेंडूत 68 धावांची खेळी करत मॅच विनिंग खेळी केली होती.  2019 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला सलामीला पराभूत केले. या हंगामातील जेतेपद मात्र मुंबई इंडियन्सनेच मिळवले होते.  युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. यावेळीही जोरदार कमबॅक करत मुंबईने विक्रमी जेतेपद आपल्या नावे केले.  
 


​ ​

संबंधित बातम्या