IPL 2020 : KKR मसल पॉवर रसेल! 12 चेंडूत MI चे 5 जण लागले गळाला (VIDEO)

टीम सकाळ
Tuesday, 13 April 2021

मुंबईच्या धावफलकावर 5 बाद 123 धावा असताना  पोलार्डसारखा तगडा मासाही रसेलच्या गळाला लागला.

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलसमोर मुंबईच्या भल्या भल्या गड्यांनी नांगी टाकली. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ गारद करणारा रसेल हा दुसरा गोलंदाज ठरलाय. यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यात हर्षल पटेल याने 27 धावा खर्च करुन पाच गडी बाद केले होते. मसल पॉवर रसेलने 2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वोच्च कामगिरी करण्याचा पराक्रम आता रसेलच्या नावे झालाय. 

मुंबईच्या धावफलकावर 5 बाद 123 धावा असताना  पोलार्डसारखा तगडा मासाही रसेलच्या गळाला लागला. 5 धावांवर विकेटमागे कार्तिकने त्याला झेल टिपला. जेसनला रसेलनं खातेही उघडू दिले नाही. अखेरच्या षटकात इयॉन मॉर्नने पुन्हा रसेलच्या हाती चेंडू सोपवला. कृणाल पांड्याने पहिल्या दोन चेंडूवर चौकार खेचले. तिसऱ्या चेंडूवर रसेलला यश मिळाले. प्रसिद्ध कृष्णाकडे झेल देऊन पांड्याने 15 धावांवर तंबूचा रस्ता धरला.बुमराहला त्याने आल्या पावली माघारी धाडले. अखेरच्या चेंडूवर राहुल चहरला बाद करत रसेलने मुंबई विरुद्ध सर्वात्तम कामगिरीची नोंद केली. 

(हेही वाचा ; यूनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम; रोहित-धोनी आसपासही नाहीत)

 

कॅरेबियन पॉवर पॅक असलेल्या आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 76 सामने खेळले आहेत. आपल्या स्फोटक फलंदाजीसह तो गोलंदाजीतही उपयुक्त ठरतो. आयपीएलमध्ये त्याच्या नावे आता 67 विकेट्सची नोंद झाली असून मुंबई विरुद्धची 15 धावांत पाच बळी ही त्याची क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम बॉलिंग फिगर आहे.   


​ ​

संबंधित बातम्या