MI vs DC : हिटमॅनचा एकहाती सिक्सर पाहिलात का? (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

रोहितने अश्विनच्या गोलंदाजीवर एका हाताने षटकार खेचला. अश्विनही हा शॉट पाहून आवाक झाल्याचे पाहायला मिळाले.

DC vs MI: अमित मिश्रा (Amit Mishra) च्या फिरकीसमोर मुंबई इंडियन्सच्या तगड्या गड्यांनी अक्षरश: गुडघे टेकले. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव 9 बाद 137 धावांत आटोपला. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सकडून अमित मिश्राने 4 षटकांच्या कोट्यात 24 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या. अमित मिश्राला आवेश खान आणि ललित यादव यांनी उत्तम साथ दिली. आवेश खानने दोन तर ललित यादवने एक विकेट घेतली. 

राजस्थानचे 12 वाजवणाऱ्या जड्डूने मैदानातून कुणाला लावला फोन? (VIDEO)

मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 30 चेंडूत 44 धावा केल्या. ईशान किशन (26), सूर्यकुमार यादव (24) आणि जयंत यादव (23) धावा करत मुंबईच्या संघाला 137 धावांपर्यंत पोहचवले. रोहितने आपल्या 44 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार खेचले. यातील अश्विच्या बॉलिंगवर मारलेल्या षटकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.  

IPL 2021: धोनी लवकरच थांबेल, वॉनचं CSK च्या नव्या कॅप्टनसंदर्भात मोठे विधान

रोहितने अश्विनच्या गोलंदाजीवर एका हाताने षटकार खेचला. अश्विनही हा शॉट पाहून आवाक झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय रोहितने कागिसो रबाडालाही जबरदस्त षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. तो अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना अमित मिश्राने त्याला बाद केले. सातव्यांदा रोहितने अमित मिश्राला आपली विकेट दिली.  चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉक स्वस्तात माघारी फिरल्यानंतर रोहितने दमदार खेळी केली. पण अर्धशतकापासून तो 6 धावा दूरच राहिला. 


​ ​

संबंधित बातम्या