IPL 2021 : PBKS च्या जोडगोळीचा DC विरुद्ध विक्रम

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. सुपर संडेच्या डबल हेडर लढतीच्या मेजवाणीतील दुसऱ्या सामन्या पहिल्यांदा बॅटिंग करताना मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल जोडी रंगात आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जे कोणालाही जमलेलं नाही ते या जोडगोळीनं करुन दाखवलं. 

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामी जोडीने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवण्याच्या इराद्याने फटकेबाजी केली. दोघांनी 12.4 ओव्हरमध्ये  122 धावा कुटल्या. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोणत्याही संघाच्या सलामी जोडीने केलेली ही विक्रमी भागीदारी ठरली. यापूर्वी 2016 मध्ये ब्रँडन मॅकुलम आणि ड्वेन स्मिथ यांनी दिल्ली विरुद्ध 112 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली होती.चार वर्षांपूर्वीचा हा विक्रम मयांक-राहुल जोडीने मोडित काढला. 

IPL 2021, RCB vs KKR : मक्सवेल समोरच पडिक्कलने केली त्याची कॉपी (VIDEO)

मयांक अग्रवालने 36 चेंडूत  69 धावा केल्या तर राहुलने 51 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे पंजाबचा संघ दोननशेपार धावा करेल, असे वाटत होते. पण ही जोडी माघारी फिरल्यानंतर स्फोटक ख्रिस गेल आणि निकोलस पुरन या कॅरेबियन जोडीने निराश केले. ही दोघ स्वस्तात माघारी फिरल्यावर दिपक हुड्डाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने 195 धावांपर्यंत मजल मारली.  क्रिस वोक्स, रबाडा, मारिवाला आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या