IPL 2021 : पंजाबच्या राहुलनं मोडला वॉटसनचा विक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021 : राहुलनं ५० चेंडूचा सामना करत ९१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ५ षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली.

IPL 2021 : आयपीएलच्या चौथ्या सामन्यात पंजाबनं राजस्थानचा अवघ्या ४ धावांनी पराभव केला. मुंबई येथील वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापीत झाले. यामध्ये पंजाबचा कर्णधार के. एल. राहुल यानं दिग्गज खेळाडू शेन वॉटससन याचा आयपीएलमधील एक विक्रम मोडीत काढला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात राहुलनं ५० चेंडूचा सामना करत ९१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ५ षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली. कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत राहुलनं आयपीएलमधील २२ वे अर्धशतक ठोकलं. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फंलदाज राहुल १२ व्या क्रमांकावर पोहचला आहे. राहुलनं यासह शेन वॉटसनला मागे टाकलं आहे. 

RR vs PBKS : रियानची अंडरआर्म बॉलिंग; अंपारयरने दिली वॉर्निंग (VIDEO)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसन यानं गतवर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेतली. वॉटसनने १४५ आयपीएल सामन्यात २१ अर्धसतक लगावली आहेत. वॉटसन यानं 30.99 च्या सरासरीनं आयपीएलमध्ये 3874 धावांचा पाऊस पाडलाय. २१ अर्धशतकासह वॉटसन यानं ४ शतकेही झळकावली आहेत. ११७ ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहेत.  पंजाबचा कर्णधार केएल राहुल यानं ८२ सामन्यात ४५.६३ च्या सरासरीनं 2738 धावा चौपल्या आहेत. यामध्ये २२ अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे. १३२ ही राहुलची सर्वोत्म धावसंख्या आहे.  (हेही वाचा : IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री)

संजूचं शतक व्यर्थ, राजस्थानचा ४ धावांनी पराभव
वानखेडेच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर पंजाबाने बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने विक्रमी शतक केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 222 धावांचे टार्गेट चेस करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारु शकला. यंदाच्या हंगामात नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरलेल्या पंजाबने 4 धावांनी सामना खिशात घातला. 
 


​ ​

संबंधित बातम्या