शाहरुखच्या KKR मधील धडाकेबाज खेळाडू गोविंदाचा आहे नातेवाईक

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

सुपरस्टार शाहरुख खान याच्या कोलकाता संघातील धडाकेबाज खेळाडू अभिनेता गोविंदाचा नातेवाईक आहे.

IPL 2021 : सुपरस्टार शाहरुख खान याच्या कोलकाता संघातील धडाकेबाज खेळाडू अभिनेता गोविंदाचा नातेवाईक आहे. होय...! कोलकाता संघातील सलामीचा फलंदाज नितेश राणा आणि गोविंदा नातेवाईक आहेत.  'द कपिल शर्मा शो'मध्ये नीतीश राणाने स्वत: याबाबतचा खुलसा केला होता. याच एपिसोडमध्ये गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकनेही नितीश राणा नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं. कृष्णा अभिषेकनं सांगितलं होतं की, नितीशची पत्नी सांची मारवाह त्याची चुलत बहिण आहे. 

नितीश राणाची पत्नी साची मारवाह (Saachi Marwah) व्यावसायनं इंटीरिअर डिजाअनर आहे. नितीश राणा आणि साची यांची जोडी अतिशय सुंदर दिसतेय. फेब्रुवारी २०१९ मध्ये नितीश राणा आणि सांची यांनी लग्न केलं. नितीश राणा कोलकाता संघातील महत्वाचा खेळाडू आहे.

अर्धशतकानंतर पत्नीसाठी खास सेलिब्रेशन- 
सनराइजर्स हैदराबादबरोबर झालेल्या सलामीच्या सामन्यात सलामीवीर फलंदाज नितीश राणानं ८० धावांची तुफानी फटकेबाजी केली. या खेळीत राणानं ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. अर्धशतक झाल्यानंतर राणानं खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. राणानं अर्धशतकानंतर बोटामधील अंगठी दाखवत सेलिब्रेसन केलं. कोरोनामुक्त होऊन मैदानात परतणाऱ्या राणानं आपलं अर्धशतक पत्नी सांचीला समर्पित केलं.


​ ​

संबंधित बातम्या