IPL 2021 : रॉयल्स चॅलेंजर्स जोमात; सनरायझर्स कोमात

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 15 April 2021

सतराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर शहाबाजने बेयरस्टोला 12(13) डिव्हिलियर्सकरवी झेलबाद केले. दुसऱ्या चेंडूवर त्याने मनिष पांड्येला 38 (39) धावांवर चालते केले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सुरुवात धमाकेदार अशीच केलीये. रॉयल चॅलेंजर्सने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 6 धावांनी पराभूत करत सलग दुसरा विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 149 धावा केल्या होत्या. यात मॅक्सवेलचे अर्धशतक 59 (41) आणि विराट कोहलीच्या 33 धावांचा समावेश होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेले आव्हान सनरायझर्स हैदराबाद सहज परतवून लावेल, असे वाटत होते. पण 17 व्या षटकात 3 विकेट मिळवत शहाबाजने सामना RCB च्या बाजूने वळवला. 

बंगळुरुने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. धावफलकावर 13 धावा असताना वृद्धिमान साहा 1 धाव करुन माघारी फिरला. डेविड वॉर्नर आणि मनिष पांड्ये यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. 37 चेंडूत 54 धावा करुन डेविड वॉर्नर तंबूत परतला. जेमीनसन याने त्याची विकेट घेतली. 

IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना

सतराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर शहाबाजने बेयरस्टोला 12(13) डिव्हिलियर्सकरवी झेलबाद केले. दुसऱ्या चेंडूवर त्याने मनिष पांड्येला 38 (39) धावांवर चालते केले. अखेरच्या चेंडूवर अब्दुल समदची विकेट घेत फिरकीपटू शहाबाजने सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने वळवला. विजय शंकर 3(5), जेसन होल्डर 4(5) धावा करुन परतल्यानंतर राशीद खानने  17 (9) हैदराबादच्या आशा पल्लवित केल्या. पण तो रन आउट झाला आणि सामना रॉयल चॅलेंजर्सच्या बाजूने झुकला. बंगळुरुचा हा सलग दुसरा विजय असून हैदराबादने दुसरा सामना गमावला आहे.


​ ​

संबंधित बातम्या