IPL 2021: हार्दिक पांड्याने मॅच फिरवली? वॉर्नरसह समद रन आउट (VIDEO) 

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

मुंबई इंडियन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेविड वॉर्नरने बेयरस्टोच्या साथीन डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. ही जोडी कृणाल पांड्यानं फोडली.

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबईने धमाकेदार विजय नोंदवला. वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स संघावर चांगल्या सुरुवातीनंतर पराभवाच्या हॅटट्रिकचे संकट ओढावले. मुंबईच्या विजयात गोलंदाजी आणि फिल्डिंग याचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. कृणाल पांड्या-राहुल चाहर या फिरकीपटूंनी मोक्याच्या क्षणी घेतलेल्या विकेट्स आणि डेथ ओव्हर्समध्ये बुमहरा-बोल्ट जोडीच्या कमालीच्या कामगिरीशिवाय हार्दिक पांड्याने जबरदस्त  फिल्डिंग करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

हार्दिक पांड्याच्या  रॉकेट थ्रोनं बदलली समीकरणं

मुंबई इंडियन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेविड वॉर्नरने बेयरस्टोच्या साथीन डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. ही जोडी कृणाल पांड्यानं फोडली. डेविड वॉर्नर सेट झाला असल्यामुळे मुंबईची धाकधूक अजून कायम होती. पण हार्दिक पांड्याने जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा दाखवून दिला. पाँइंटला उभे असलेल्या हार्दिकने डायरेक्ट थ्रो करुन वॉर्नरला बाद केले.

 

IPL 2021, MIvsSRH Match Highlights : MI म्हणजे 'डेथ ओव्हर्सचा डेंजर झोन' (VIDEO)

12 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराह सिंहने खेळलेल्या चेंडूवर सिंगल धाव घेताना वॉर्नरला विकेट गमवावी लागले. तो 36 धावा करुन बाद झाला. त्याच्याशिवाय अब्दुल समदलाही हार्दिक पांड्याने रन आउट करत संघासाठी मोलाची विकेट मिळवून दिली.  मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात  150 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव 137 धावांत आटोपला. जॉनी बेयरस्टो आणि वॉर्नर यांच्यानंतर कोणीही मैदानात तग धरला नाही. हैदराबादचा स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ड आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.   


​ ​

संबंधित बातम्या