IPL 2021 : मॅक्सवेलनं असा दूर केला क्वारंटाईनचा थकवा! (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 6 April 2021

मॅक्सवेलने सरावावेळी रिव्हर्स स्विपवर अधिक भर दिला.

IPL 2021: कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत आयपीएलमधील खेळाडू स्पर्धेची जोरदार तयारी करत आहेत. विराट कोहलीच्या RCB च्या ताफ्यातील मॅक्सवेलने क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर आपल्या संघातील खेळाडूंसोबत सराव केला. आरसीबीने सोशल मीडियावरुन त्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. मॅक्सवेल आरसीबीतील सर्व खेळाडूंना भेटल्यानंतर  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal)  गळाभेट घेतली.

सहकाऱ्यांना भेटल्यानंतर त्याने प्रॅक्टिस मॅचमध्ये आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजारा पेश केला. तुफान फटकेबाजी करुन आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी सज्ज असल्याचे संकेतच त्याने दिले. मॅक्सवेलने सरावावेळी रिव्हर्स स्विपवर अधिक भर दिला. आरसीबीने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्याचा व्हिडिओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरलही होताना दिसते.  

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय मैदानात धमाकेदार कामगिरी करताना अनेकदा पाहायला मिळाले असले तरी आयपीएलमध्ये त्याला नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळेच पंजाब किंग्जने लिलावापूर्वीच त्याला रिलीज केले होते. त्याच्यावर मोठी बोली लावण्याचं धाडस कोण करेल? असा प्रश्न निर्माण झाला असताना रॉयल चॅलेंजर्सने त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये मोजून आपली फलंदाजी भक्कम करण्याचा निर्णय घेतला.  

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

आयपीएलमध्ये मॅक्सवेलने आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. यात  154.68 च्या स्ट्राईक रेटने त्याने 6 अर्धशतकाच्या मदतीने 1505 धावा केल्या आहेत. सामन्याला कलाटणी देणारी खेळी करण्याची क्षमता मॅक्सवेलमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मॅक्सवेलने 3 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याने फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले होते. 


​ ​

संबंधित बातम्या