CSK vs RR : बॉलसह बॅटही उडाली हवेत; पण ब्रावो थांबला नाही (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

ब्रावोने 8 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 20 धावांची भर घात चेन्नईच्या संघाची धावसंख्या 188 पर्यंत पोहचवली.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या आघाडीच्या आणि नावाजलेल्या अनुभवी गड्यांना नावाला साजेसा खेळ दाखवण्यात अपयश आले. फाफ ड्युप्लेसीसनं चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर रैना, धोनी जडेजा हे त्रिकूट सपशेल अपयशी ठरले. अखेरच्या टप्प्यात ड्वेन ब्रावोने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला 188 धावांपर्यंत मजल मारता आली. 

ब्रावोने 8 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 20 धावांची भर घात चेन्नईच्या संघाची धावसंख्या 188 पर्यंत पोहचवली. त्याच्या खेळीच्या दरम्यान एक अफलातून क्षण मॅच पाहणाऱ्यांनी अनुभवला. राजस्थान रॉयल्सकडून शेवटची ओव्हर घेऊन आलेल्या मुस्तफिजूरच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रावोने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फटका मारल्यानंतर बॉलसह बॅटही हवेत उडाल्याचे पाहायला मिळाले.  

CSK चा जुना फोटो व्हायरल होण्यामागचे कारण माहितेय?

CSK चा जुना फोटो व्हायरल होण्यामागचे कारण माहितेय?

यापरिस्थितीतून सावरत ब्रावोने दोन धावा पूर्ण केल्या. कॅचची संधी हुकल्यानंतर ब्रावोला रन आउट करण्याची संधीही राजस्थानला मिळाली होती. पण ब्रावोने हातात बॅट नसताना वेगाने धाव पूर्ण केली. तो सुरक्षित क्रिजमध्ये पोहचला. मैदानातील पंचांनी रन आउटसाठी थर्ड अंपायरची मदत घेतली. पण ब्रावो जलद क्रिजमध्ये पोहचल्यामुळे त्याला नाबाद देण्यात आले. मुस्तफिजुरच्या पुढच्या तीन चेंडूवर ब्रावोने  8 धावाही कुटल्या.

 

प्रथम बॅटिंगची वेळ आल्यावर फाफ ड्युप्लेसीस आणि ऋतूराज गायकवाड या जोडीने चेन्नई सुपर किंग्जच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 25 धावा असताना मुस्तफिजूरने राजस्थान रॉयल्सला पहिले यश मिळवून दिले. फाफ ड्युप्लेसीने चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वोच्च 33 धावा केल्या. रैना 18, रायडू 27, धोनी 18, सॅम कुरेन 13 धावा करुन परतल्यानंतर ब्रावोने 20 धावांची उपयुक्त खेळी केली.


​ ​

संबंधित बातम्या