सुरेश रैनाऐवजी तिसऱ्या क्रमांकावर मोईन अली का? - धोनीनं केला खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 April 2021

IPL 2021 : आयपीएल 2021 या हंगामात रैना ऐवजी मोईन अली चेन्नईकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला दिसतोय....

दिपक चाहरचा भेदक मारा, जडेजाची जबऱ्या फिल्डिंग आणि मोईन अलीच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून महेंद्र सिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिपक चाहरने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या आघाडीला सुरुंग लावला. शाहरुख खानने केलेल्या 47 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने कशाबशा 20 षटकांत106 धावा केल्या. 107 धावांचा पाठलाग सहज करत चेन्नई सुपर किंग्जने 6 विकेट आणि 24 चेंडू राखून विजय नोंदवला. चेन्नईचा कर्णधार धोनीसाठी हा विजय खास आहे, कारण धोनीचा चेन्नईच्या जर्सीमधील हा 200 वा सामना होत. या विजयाला धोनीनं खास सांगितलं तसेच 200 सामने एखाद्या संघाकडून खेळणं मोठी उपलबधता असल्याचं सांगितलं.  

सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, '200 सामने खेळणं खूप मोठी गोष्ट आहे. 2008 मध्ये या प्रवासाला सुरुवात झाली होती. 2011 मध्ये अखेरचं चेन्नईच्या खेळपट्टीमुळे खूश झालो होतो. त्यावेळी खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता आणि वेगवान माऱ्यालाही मदत मिळत होती. सध्याची मुंबईची खेळपट्टीही मिळतीजुळती आहे.' 

हेही वाचा : IPL 2021 : जड्डूची कमाल; गेलचा झेल आणि राहुलचा गेम (VIDEO)
 
पुढे तो म्हणाला, "दीपक चाहर डेथ षटकातही चांगली गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. पण मला वाटतं, त्यानं पावरप्‍लेमध्ये गोलंदाजी करावी. कारण डेथ षटकात आमच्याकडे ब्राव्हो आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर रैनाऐवजी मोईन अलीला खेळवण्यात कोणताही खास गोष्ट नाही.  आम्ही मोईनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवू इच्छितो. मोठे फटके मारण्याची त्याच्यात क्षमता आहे. कोणत्या खेळाडूला कुठे खेळवायचं ? यापेक्षा आहे त्या खेळाडूंचा चांगला वापर करायला हवा. हे महत्वाचं आहे.  त्यामुळे अलीला आम्ही तिसऱ्या क्रमांकावर"

दरम्यान, पंजाबला 106 धावांवर रोखल्यानंतर धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवातही खराब झाली. ऋतूराज गायकवा 5 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने फाफ ड्युप्लेसीससोबत 66 धावांची भागीदारी केली. तो 31 चेंडूत 46 धावा करुन माघारी फिरला. एम. अश्विनने त्याची विकेट घेतली. शमीने सुरेश रैना (8) अंबाती रायडूला शून्यावर तंबूत धाडले. फाफच्या नाबाद 36 धावा आणि सॅम कुरेन नाबाद 5 धावा करत चेन्नईला विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबकडून मोहम्मद शमीने 2 तर एम अश्विन आणि रिचर्डसन यांनी एक- एक विकेट घेतली.


​ ​

संबंधित बातम्या