CSKvsDC : गब्बरचा जबरदस्त कॅच; ऋतूराजला स्वस्तात धाडलं तंबूत (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 10 April 2021

युएईतील मैदानात रंगलेल्या स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात ऋतूराज गायकवाडने दमदार कामगिरी केली होती. तो संघाला चांगली सुरुवात करुन देईल, अशी आशा होती. पण त्यानेही अवघ्या 5 धावा करुन तंबूचा रस्ता धरला.

CSKvsDC : मुंबईच्या वानखेडे मैदानात आयपीएल स्पर्धेतील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसी या जोडीने चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. आवेश खानने फाफच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. फाफ ड्युप्लेसीला खातेही उघडता आले नाही. तो पायचित झाला. 

 

युएईतील मैदानात रंगलेल्या स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात ऋतूराज गायकवाडने दमदार कामगिरी केली होती. तो संघाला चांगली सुरुवात करुन देईल, अशी आशा होती. पण त्यानेही अवघ्या 5 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. क्रिस वोक्सने शिखर धवनकरवी त्याला झेलबाद केले. गब्बरने त्याचा जब्बर झेल टिपत आपल्या शैलीत आनंद साजरा केला. कॅच घेतल्यानंतर शिखर धवन शड्डू ठोकून आनंद व्यक्त करतो. ही त्याची एक स्टाईलच बनली आहे. ऋतूराजचा कॅच घतल्यावरही त्याची ही स्टाईल पाहायला मिळाली.  अवघ्या 7 धावांत चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीवीरांना माघारी धाडत दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली. सुरुवातीच्या पडझडीतून  सावरुन  चॅलेंजिंग टार्गेट ठेवण्याचे आव्हान चेन्नईसमोर आहे.


​ ​

संबंधित बातम्या