IPL 2021, RCB vs KKR : मॅक्सवेल समोरच पडिक्कलने केली त्याची कॉपी (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स टीम
Sunday, 18 April 2021

रॉयल चॅलेंजर्सच्या डावातील 11 व्या षटकात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगच्या पहिल्याच चेंडूवर त्याने एक अप्रतिम रिव्हर्स स्विप खेळला.

Bangalore vs Kolkata, 10th Match : कोलकाता नाईट (KKR) विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) 200 + धावा केल्या. यात मक्सवेल 78 (49) आणि एबी डिव्हिलियर्स 76 (34)* यांनी मोठी खेळी केली. विराट कोहली अवघ्या 5 धावा करुन परतल्यानंतर युवा सलामीवीर पडिक्कलने मॅक्सवेलसोबत 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मॅक्सवेल आणि एबीने धावांची बरसात केली. या दोघांच्या खेळीत 25 धावा करणाऱ्या पडिक्कलने एका खणखणीत चौकाराने लक्षवेधून घेतले. 

रॉयल चॅलेंजर्सच्या डावातील 11 व्या षटकात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगच्या पहिल्याच चेंडूवर त्याने एक अप्रतिम रिव्हर्स स्विप खेळला. यावर त्याला चार धावा मिळाल्या. मॅक्सवेलच्या तोऱ्यात मारलेला हा फटका पाहण्याजोगा असाच होता. नॉनस्ट्राईकवर असलेल्या मॅक्सवेलने देवदत्त पडिक्कलचे याबद्ल कौतुकही केले. त्याने पडिक्कलच्या हेल्मेटवर थाप मारुन 'वेलप्लेड' असाच इशारा जणू केल्याचे पाहायला मिळाले. देवदत्त पडिक्कलने आपल्या इनिंगमध्ये 28 चेंडूत 25 धावा केल्या यात दोन चौकारांचा समावेश होता. 

 

IPL 2021, RCB vs KKR : पुण्याच्या राहुलचा जबऱ्या कॅच; मिस्ट्री स्पिनरच्या नावे 'विराट' विकेट (VIDEO)

रॉयल चॅलेंजर्सकडून मॅक्सवेल आणि एबीने तुफानी खेळी केली. मॅक्सवेलने 49 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 78 धावा कुटल्या. कमिन्सने त्याला हरभजनकरवी झेलबाद केले. तोपर्यंत त्याने आपले काम केले होते. दुसऱ्या बाजुला एबी डिव्हिलियर्सने 34 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 3 षटकार खेचले. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर खराब सुरुवातीनंतरही RCB ने निर्धारित 20 षटकात 204 धावा करुन प्रतिस्पर्धी संघासमोर डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या