IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का; अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

कोलकाता नाइटराइडर्स (Kolkata Knight Riders) चा फलंदाज नीतीश राणा (Nitish Rana) चा कोरोना चाचणीचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आले होते.  

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कार्यरत असलेल्या ग्राउंड स्टाफमधील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तानंतर आता प्रमुख खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel COVID-19 Positive)याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात काही सामने रंगणार आहेत. या सामन्याच्या तयारीसाठी 19 कर्मचारी कार्यरत होते. यातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. त्यानंतर आता कोरोनाचा धोका खेळाडूंपर्यंत येऊन पोहचला आहे. 

एएनआयने दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,  अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या घडीला तो क्वारंटाईन असून प्रोटोकॉलनुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. यापूर्वी कोलकाता नाइटराइडर्स (Kolkata Knight Riders) चा फलंदाज नीतीश राणा (Nitish Rana) चा कोरोना चाचणीचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आले होते.  दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतलीय. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला आता दुसरा धक्का बसला आहे.   

IPL 2021 : दिल्ली वर्सेस चेन्नई सामन्यापूर्वी टेन्शन; वानखेडेवरील 8 कर्मचाऱ्यांना कोरोना

IPL 2021: Big blow for DC as Axar Patel tests positive for COVID-19

Read @ANI Story | https://t.co/SLg4MTcZBt pic.twitter.com/Y1y8U426W3

— ANI Digital (@ani_digital) April 3, 2021

आयपीएलमधील 10 सामने हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नियोजित आहेत. 10 एप्रिल रोजी रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध नियोजित आहे. या सामन्यापूर्वी ग्राउंड स्टाफ आणि आता खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी आयोजकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. 


​ ​

संबंधित बातम्या