IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एनरिक नोर्तजे आयपीएलसाठी पाकिस्तान विरुद्धची घरच्या मैदानात सुरु असलेली मालिका सोडून भारतात दाखल झालाय.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्ट्जे ( Anrich Nortje) याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होती. अक्षर पटेल 28 मार्च रोजी टीमच्या हॉटेलमध्ये पोहचला होता. दुसऱ्या चाचणीतील त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एनरिक नोर्तजे आयपीएलसाठी पाकिस्तान विरुद्धची घरच्या मैदानात सुरु असलेली मालिका सोडून भारतात दाखल झालाय. कोरोना नियमावलीनुसार दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर त्याला 7 दिवस क्वारंटाईन रहावे लागले होते. त्यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तो संघात सामील नव्हता. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 7 विकेट्सनी जिंकला होता. नोर्तजे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यतील प्रमुख गोलंदाज आहे. मागील हंगामात त्याने लक्षवेधी कामगिरी केली होती. युएईच्या मैदानात राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला होता. 2012 ते 2020 या हंगामात त्याने 156.2 KMPH (किलोमीटर प्रति तास) वेगाने फेकलेला चेंडूची नोंद झाली होती.
विराटचा बंगळूर दुसऱ्या विजयासाठी सज्ज
आयपीएलच्या इतिहास सर्वाधिक जलद चेंडू फेकण्याचा विक्रम हा शॉन टेटच्या नावे आहे. 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शॉनने 157.7 KMPH वेगाने चेंडू फेकला होता. एनरिक नोर्तजेने 2020 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केले असून मागील हंगामातील16 सामन्यात त्याने 22 विकेट घेतल्या आहेत. तो रिकव्हर होऊन लवकरात लवकर संघात परतावा, अशीच दिल्ली कॅपिटल्सची इच्छा असेल.