दीपकचा षटकारांचा पाऊस, केला मोठा विक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021  - आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूमध्ये दीपक हुड्डा  संयुक्तरित्या सातव्या क्रमांकावर पोहचला

IPL 2021 : आयपीएलच्या चौथ्या सामन्यात पंजाबनं राजस्थानचा अवघ्या ४ धावांनी पराभव केला. मुंबई येथील वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात अनेक विक्रम झाले. सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या दीपक हुड्डानं चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची पिसे काढली. दीपक हुड्डानं अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दीपक हुड्डाची खेळी ६३ धावांवर संपुष्टात आली. २८ चेंडूत सहा षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं दीपक हुड्डानं धावांचा पाऊस पाडला. तुफानी फटकेबाजी करत अवघ्या २० चेंडूत अर्धशतक करणाऱ्या दीपक हुड्डानं आपल्या नावावर विक्रम केला आहे. RR vs PBKS : रियानची अंडरआर्म बॉलिंग; अंपारयरने दिली वॉर्निंग (VIDEO)

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूमध्ये दीपक हुड्डा  संयुक्तरित्या सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. तर दुसरा अनकॅप्ड भारतीय फलंदाज बनला आहे. इतकेच नाही तर दीपकनं २०१५ मधील स्वत: केलेला आणि २०१६ मध्ये मुंबईच्या क्रृणाल पांड्यानं केलेला विक्रम मोडीत काढला आहे. दीपकने २०१५ आयपीएलमध्ये दिल्लीविरोधात २२ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. २०१६ मध्ये मुंबईच्या क्रृणाल पांड्यानेही दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत २२ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.  हे सर्व विक्रम सोमवारी दीपक हुड्डानं मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (हेही वाचा ; IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री)

संजूचं शतक व्यर्थ, राजस्थानचा ४ धावांनी पराभव
वानखेडेच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर पंजाबाने बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने विक्रमी शतक केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 222 धावांचे टार्गेट चेस करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारु शकला. यंदाच्या हंगामात नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरलेल्या पंजाबने 4 धावांनी सामना खिशात घातला. 
 


​ ​

संबंधित बातम्या