IPL 2021 : मॅच संपली आणि या फोटोची चर्चा रंगली

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 17 April 2021

मॅच संपल्यानंतर सोशल मीडियावर दिपक चाहर आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami)  यांच्या फोटोनं धुमाकूळ घातलाय.

Indian Premier League 2021 :  इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2020) स्पर्धेतील आठव्या सामन्यात दिपक चहरच्या (Deepak Chahar)  भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) वानखेडेचे मैदान मारले. चाहरने आघाडीच्या चार फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. ही चेन्नईच्या स्पर्धेतील पहिल्या वहिल्या विजयाचा ट्रेलर होता. दिपक चाहरने 4 षटकात घेतलेल्या 4 विकेट्सनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मैदानातील कामगिरीसह मैदानात उतरण्यापूर्वी त्याने केलेल कृत्य देखील चर्चेचा विषय ठरले असून त्यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'

मॅच संपल्यानंतर सोशल मीडियावर दिपक चाहर आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami)  यांच्या फोटोनं धुमाकूळ घातलाय. या फोटोत दिपक चाहर  पंजाब किंग्जचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचे पाय धरताना दिसते. यावेळी शमी त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते.  सामन्यापूर्वी ज्यावेळी शमी आणि चाहर वॉर्म-अप करताना हा सर्व प्रकार घडला. मोहम्मद शमी आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू असलेल्या सुरेश रैना आणि इमरान ताहिर याच्यासोबत चर्चा करत असताना दिपक चाहर याठिकाणी आला. यावेळी त्याने आपला रोल मॉडेल असलेल्या शमीचा पाय धरून आशीर्वाद घेताना दिसले. शमी त्याला असं करु नकोस, अशा अविर्भावात रोखतानाही फोटोमध्ये दिसते.  

IPL 2021 : जड्डूची कमाल; गेलचा झेल आणि राहुलचा गेम (VIDEO)

शमीचा आशीर्वाद घेऊन चाहरने पंजाब किंग्जच्या संघाचे कंबरडे मोडण्याचा पराक्रमच करुन दाखवला. 4 ओव्हरमध्ये 13 रन्स खर्च करून त्याने 4 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. आयपीएलच्या कारकिर्दीतील चाहरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने मयांक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन आणि दिपक हुड्डा यांची शिकार केली. त्याच्या या कामगिरीमुळे दिल्ली विरुद्ध पराभूत झालेल्या चेन्नईने स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. त्याच्यासह रविंद्र जडेजाने अफलातून फिल्डिंगने लक्ष वेधले तर मोईन अलीने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.  
 


​ ​

संबंधित बातम्या